बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. माधुरी सोशल मीडिया सक्रिय असते, तिने शेअर केलेले अनेक फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होतं असतात. माधुरी नेहमीच ट्रेंड फॉलो करत असते आणि इन्स्टाग्रामवर रीलस् शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने ‘Physically Fit’ या गाण्यावर रील डान्स करताना दिसत होती आणि आता असाच अजून एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होतं आहे.
इन्स्टाग्रामवर ‘मॉडेलफेस’ हे चॅलेंज प्रचंड ट्रेंड होतं आहे. माधुरी दीक्षितने देखील हा व्हिडीओ तयार करत इन्स्टावर पोस्ट केला आहे आणि हे चॅलेंज तिने उत्तम रित्या पार पडले आहे. या व्हिडीओच्या सुरवातीला एक आवाज माधुरीला मार्गदर्शन करताना दिसत आहे आणि मग शेवटी तो आवाज हा तुझा मॉडेलफेस आहे असे सांगताच ती एखाद्या मॉडेल सारखी चालत पुढे गेली. तिने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं, ” फक्त मनोरंजनासाठी #मॉडेलफेस”. तिच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी कमेंट केली. तसंच फॅन्सनाही तिचे हे चॅलेंज खुप आवडलं आहे.
View this post on Instagram
याआधी माधुरीने तिच्या नवीन लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यात ती अतिशय सुंदर दिसत होती. माधुरीच्या या फोटोंनी अनेकांची मने जिंकली आहेत. माधुरीच्या कामा बद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट आणि वरुण धावन स्टारर ‘कलंक’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकली आहे. तसंच कलर्सवरील रिअॅलीटी शो ‘डान्स दिवाने’ मध्ये जजची भूमिका साकारत आहे.