अभिनेता सलमान खान आणि त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये नेहमीच उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळते. मनमिळाऊ, खोडकर वृत्ती असलेला हा अभिनेता नेहमीच चाहत्यांची मनं जिंकण्यात यशस्वी होतो. अभिनयासोबतच सलमानला सायकलस्वारीचीही आवड आहे. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या राहत्या घराजवळील परिसरात सलमान अनेकदा सायकरस्वारीसाठी बाहेर येतो. त्यामुळे भाईजानच्या घरासमोर नेहमीच चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. आपल्या सायकलस्वारीने अनपेक्षितपणे सर्वांसमोर येत अनेकांनाच आश्चर्याचा धक्का देणाऱ्या सलमान खानने पुन्हा एकदा असेच काहीसे केले आहे.

पनवेल येथील फार्म हाऊसच्या परिसरात सलमान नुकताच सायकलस्वारीसाठी बाहेर आला होता. भाईजानला अचानकपणे असे पाहून स्थानिकांना काही क्षणांसाठी त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेनासा झाला. यावेळी स्वेटशर्ट, टोपी, गॉगल या पेहरावात सलमान दिसला होता. सलमानने परिधान केलेला एकंदर पोषाख पाहता त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा लूक सर्वांच्याच नजरेआड ठेवण्यासाठीच तो प्रयत्नशील असल्याचे दिसत होते. सलमानने त्याचा लूक कितीही लपवण्याचा प्रयत्न केला असला तरीही सोशल मीडियावर मात्र सध्या त्याचे काही फोटो प्रचंड चर्चेत आहेत. यामध्ये सलमान फार वेगळा दिसत असून, त्याचा लूक ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटातीलच असल्याचे म्हटले जात आहे.

सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला लवकरच सुरुवात होणार असून, या संबंधीचे ट्विट काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन केले होते. जफर यांचे ट्विट पाहता हा चित्रपट अतिशय थंड हवामानाच्या ठिकाणी चित्रित केला जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पनवेल येथील फार्म हाऊसच्या परिसरात सायकल चालवणारा सलमान काही दिवसांपूर्वी मुंबईतही सायकल चालवताना दिसला होता. पण, ही सायकलस्वारी तो त्याच्या आगामी चित्रपटातील भूमिकेच्या तयारीसाठी करत असल्याचे म्हटले जात आहे. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटामध्ये सलमान खान एका रॉ एजंटची भूमिका साकारणार असून, या चित्रपटाच्या निमित्ताने तो पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वल असणाऱ्या या चित्रपटाची आतापासूनच चर्चा सुरू आहे. त्यात सोशल मीडियावर व्हायरल झालेला सलमानचा फोटो आणि त्याच्या नव्या लूकची चर्चा यामुळे ‘टायगर जिंदा है’बद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे असेच म्हणावे लागेल.

https://twitter.com/aliabbaszafar/status/838287817860079616

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

https://twitter.com/aliabbaszafar/status/837342365950042112