‘काहीही केलंस तरी तू संजू होऊ शकत नाही’- अर्शद वारसी

Arshad Warsi Comments on Ranbir Kapoor’s Sanju दुसऱ्यांसारखा अभिनय करणं, दुसऱ्यांसारखं चालणं, बोलणं या सर्व गोष्टी आत्मसात करणं फार कठीण असतं

Sanju: After Salman, Arshad says, 'You can't be the original'

Arshad Warsi Comments on Ranbir Kapoor’s Sanju रणबीर कपूर स्टारर ‘संजू’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरमधील रणबीरचे काम पाहून अनेकांनी त्याचे भरभरून कौतुक केले. पण ‘रेस- ३’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान सलमानने संजू सिनेमाबद्दल आपले मत मांडताना म्हटले की, ‘संजू सिनेमाच्या शेवटी रणबीर कपूरऐवजी संजय दत्तनेच त्याची भूमिका साकारायला हवी होती.’ सलमानच्या या वक्तव्यानंतर आता संजयचा जवळचा मित्र सर्किट अर्थात अर्शद वारसीनेही संजू ट्रेलर पाहून आपले मत दिले आहे.

अर्शद म्हणाला की, ‘रणबीर फार चांगला अभिनेता आहे. पण दुसऱ्यांसारखा अभिनय करणं, दुसऱ्यांसारखं चालणं, बोलणं या सर्व गोष्टी आत्मसात करणं फार कठीण असतं. मात्र यात रणबीर चांगला आहे. पण संजू हा संजूच आहे. तुम्ही काहीही तरा पण खऱ्या संजूसारखं तुम्ही बनू शकत नाही. संजयसारखं तुम्ही बोलू शकता, चालू शकता, अभिनयही करु शकता पण काही झालं तरी संजूसारखं बनू शकत नाही. संजय दत्त एकच आहे.’

राजकुमार हिरानी दिग्दर्शित संजू हा सिनेमा येत्या २९ जूनला प्रदर्शित होत आहे. या सिनेमात रणबीर कपूरसह परेश रावल, मनीषा कोइराला, सोनम कपूर, विक्की कौशल आणि दिया मिर्जा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

sanju
संजू

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood movie biopic sanju arshad warsi agreed with salman khan statement on ranbir kapoors you cant be a origional sanjay dutt

ताज्या बातम्या