‘आशिकी-२’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला आणि सध्या बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेला गायक अंकित तिवारी याला अखेर न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला.  
लग्नाचे आश्वासन देऊन नंतर त्यावरून घूमजाव केल्याचा आरोप करीत त्याच्या प्रेयसीने त्याच्याविरुद्ध पोलिसांत धाव घेतली होती. त्यानंतर ८ मे रोजी बलात्काराच्या गुन्ह्याखाली अंकितला अटक करण्यात आली होती.
न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर अंकितने जामिनासाठी अर्ज केला होता.
ती विवाहित असून तिला मुलगा आहे आणि या प्रकरणी आपल्याला गोवण्यात आल्याचा तसेच तिच्या जबाबातही विसंगती असल्याचा दावा करीत जामिनावर सुटका करण्याची मागणी अंकितने अर्जात केली होती.