गेले काही दिवस मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि दिग्दर्शक किरण रावच्या ‘लापता लेडीज’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता. घटस्फोटानंतरही आमिर आणि किरणने एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. आज आमिर खान त्याच्या प्रोडक्शन्स हाऊसच्या इन्स्टाग्राम पेजवरून लाइव्ह आला होता. यात धूम्रपान करत त्याने चाहत्यांशी गप्पा मारल्या आणि अनेक प्रश्नांची उत्तरेदेखील दिली.

एका चाहत्याने त्याला प्रश्न विचारला, “तुम्ही मुकेश अंबानींच्या मुलाच्या म्हणजेच अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात डान्स केलात, परंतु तुमच्या मुलीच्या आयराच्या लग्नात तुम्ही अजिबात नाचला नाहीत. यावर आमिर म्हणाला, “डान्स तर मी माझ्या मुलीच्या लग्नातही केला होता आणि मुकेशच्या मुलाच्या लग्नातही केला; कारण मुकेश माझा खूप जवळचा मित्र आहे. नीता, मुकेश आणि त्यांच्या कुटुंबाला मी आपलंच कुटुंब मानतो.”

हेही वाचा… ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याची नवीकोरी कार गायब; व्हिडीओ शेअर करीत म्हणाला, “ज्याने कोणी अशी मस्करी…”

आमिरच्या या लाइव्हवर अजून एक प्रश्न आला, त्यात लिहिले होते की, तुम्ही ‘पठाण’ सारखे चित्रपट का बनवत नाही. यावर आमिर म्हणाला, यार शाहरुख खान बनवतोय ना ‘पठाण’ सारखे चांगले चित्रपट. मी ‘लापता लेडीज’ बनवला आहे, तुम्ही तो चित्रपट बघा.”

हेही वाचा… मलायका अरोराबरोबर थिरकणारा ‘हा’ मराठी तरूण आहे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, “आंटी बस…”

लोकांनी चांगल्या सिनेमाला आणि इंडस्ट्रीतील नवोदितांना पाठिंबा द्यावा. ‘लापता लेडीज’ची निर्मिती करून त्याने हेच करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही आमिर म्हणाला. चांगला सिनेमा चित्रपटगृहात चालत नाही आणि फक्त ॲक्शन चित्रपट चांगले चालतात, असे मानणाऱ्या लोकांना प्रेक्षक चुकीचे सिद्ध करतील, अशी आशा आमिरने व्यक्त केली.

हेही वाचा… “वनतारा प्रोजेक्ट आमच्या जवळचा”, प्री-वेडिंग सोहळ्यासाठी राधिका मर्चंटने केलेली खास तयारी, खुलासा करत म्हणाली…

आमिर धूम्रपान करत म्हणाला, ज्यात नावाजलेले कलाकार नाहीत असा चित्रपट तुम्हाला आवडला असेल तर त्याला तुम्ही नक्कीच सपोर्ट करा. वाढदिवसाच्या निमित्ताने १४ मार्च रोजी परत एकदा इन्स्टाग्राम लाइव्हवर येऊन चाहत्यांशी गप्पा मारणार असं आमिरने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आमिर खान आणि किरण रावचा ‘लापता लेडीज’ चित्रपट ८ सप्टेंबर २०२३ रोजी टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (TIFF) प्रदर्शित करण्यात आला होता, तर १ मार्च रोजी ‘लापता लेडीज’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात नितांशी गोएल, प्रतिभा रांता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम, रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.