अभिनेता आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाने प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पुरता अपयशी ठरला. आता आमिरच्या नव्या व धमाकेदार चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. अशातच आमिरचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आमिरला नव्या लूकमध्ये ओळखणंही कठीण झालं आहे. स्वतःच्याच प्रॉडक्शन हाऊसमध्ये पूजा करतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा – Video : राणादा-पाठकबाईंच्या लग्नाची क्रेझ काही संपेना, नवऱ्यासाठी गायलं रोमँटिक गाणं, हार्दिकही भारावला अन्…

‘लाल सिंह चड्ढा’चे दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे आमिरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आमिर त्याच्या आमिर खान प्रॉडक्शन हाऊसमध्ये पूजा करताना दिसत आहे. आमिरबरोबर त्याची पूर्वाश्रमीची पत्नीही दिसत आहे.

डोक्यावर पांढऱ्या रंगाची टोपी, कपाळावर टिळा, उपरणं, हातात कलश घेऊन आमिर पूजा करत आहे. शिवाय पूजा केल्यानंतर आमिर त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर आरतीही करताना दिसत आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने आमिरने त्याच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये पूजा केली आहे.

मुंबईमध्ये आमिरने त्याच्या प्रॉडक्शन हाऊससाठी नवी जागा घेतली आहे. त्याचीच ही पूजा होती. पांढरे केस, दाढी, मिशीमध्ये आमिरचा लूक वेगळाच वाटत आहे. या पूजेला आमिर खान प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही हजेरी लावली होती. सध्या आमिरने केलेल्या या पारंपरिक पूजेची व त्याच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.