अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या ‘चंद्रमुखी २’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपटाचा ‘चंद्रमुखी २’ हा सीक्वेल आहे. कंगना रणौतने जवळपास दीड वर्षांनंतर या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. प्रदर्शित झाल्यापासून ‘चंद्रमुखी २’ चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील गाणी हिंदीमध्येही डब करण्यात आली असून यामधील एक गाणं लोकप्रिय मराठी गायिका आर्या आंबेकरने गायलं आहे.

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारने फुटपाथवरून चालणाऱ्या जोडप्याला दिली धडक; महिलेचा मृत्यू, पतीची प्रकृती चिंताजनक

आर्याने ‘चंद्रमुखी २’ चित्रपटासाठी ‘स्वागाथांजली’ गाण्याचं हिंदी व्हर्जन गायलं आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली. गायिका लिहिते, “तुम्हाला कधी आश्चर्याचा धक्का बसला आहे का? ‘चंद्रमुखी २’ आणि ‘ऑस्कर’ विजेत्या ‘नाटू नाटू’ गाण्याचे संगीतकार एमएम कीरावनी यांच्यासह काम करण्याची संधी मिळाल्यावर माझ्या मनात सुद्धा अशीच भावना होती. कंगना रणौत यांच्या ‘चंद्रमुखी २’ चित्रपटातील ‘स्वागाथांजली’ गाण्याचं हिंदी व्हर्जनी मी गायलं आहे.”

हेही वाचा : प्रियांका चोप्राच्या आईने शेअर केला परिणीती-राघवच्या लग्नातील Unseen फोटो, म्हणाल्या…

“वैभव जोशी दादाने हे गाणं अतिशय सुंदररित्या लिहिलं आहे. मनात फक्त कृतज्ञता हा एकच भाव आहे. गणपती बाप्पा मोरया! या गाण्यासाठी माझ्यावर ज्यांनी विश्वास ठेवला त्या सगळ्यांचे आभार! ‘चंद्रमुखी २’ चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहा.” असं कॅप्शन आर्याने ‘चंद्रमुखी २’ चित्रपटाचं पोस्टर शेअर करत दिलं आहे.

हेही वाचा : शिवानी रांगोळेच्या ऑनस्क्रीन लग्नाबाबत विराजस कुलकर्णीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्या आंबेकरच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने गायिकेच्या पोस्टवर, “याचा अर्थ तू २ चंद्रमुखींसाठी गाणं गायलं आहे.” अशी कमेंट केली आहे. तसेच इतर काही नेटकऱ्यांनी सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये आर्याचं भरभरून कौतुक केलं आहे.