अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सातत्याने धमक्या येत आहेत. त्यानंतर शाहरुख खानलादेखील धमकी आली. आता दोन्ही खाननंतर ज्येष्ठ अभिनेते व भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांनाही लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित पाकिस्तानी गँगस्टरकडून धमकी आली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीने मिथुन यांना त्यांच्या मुस्लिमांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर माफी मागण्यास सांगितलं आहे.

पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मिथुन यांच्यासाठी असल्याचं भट्टीने म्हटलं आहे. मिथुन यांना मुस्लीम समुदायाविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून शहजादने धमकी दिली आहे. मिथुन यांनी १०-१५ दिवसांत माफी मागावी असं त्याने म्हटलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ‘स्त्री २’ नव्हे तर ‘हा’ आहे २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट; जगभरात कमावले तब्बल…

२७ ऑक्टोबर रोजी बंगालमध्ये भाजपाचा सदस्यत्व मोहिमेदरम्यान मिथुन चक्रवर्ती यांनी केलेल्या वक्तव्यावरून शहजाद भट्टीने त्यांना धमकी दिली आहे. या भाषणानंतर मिथुन यांच्याविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते. आता त्याच वक्तव्याबद्दल मिथुन यांनी जाहीर माफी मागावी, असं भट्टीने म्हटलंय.

हेही वाचा – बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…

शहजाद भट्टी काय म्हणाला?

“हा व्हिडीओ मिथुनसाठी आहे, ज्यांनी काही दिवसांंपूर्वी म्हटलं की ते ‘मुस्लिमांना कापून त्यांच्या जागेत फेकून देईल’. मिथुन साहेब, तुम्हाला माझा प्रेमाने सल्ला आहे की १०-१५ दिवसांत एक व्हिडीओ बनवा आणि माफी मागा. हेच तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही लोकांची मनं दुखावली आहेत. इतर धर्माच्या लोकांनी तुमच्यावर जेवढं प्रेम केलं, तेवढाच आदर तुम्हाला मुस्लिमांनीही दिला आहे. तुमचे फ्लॉप चित्रपट याच लोकांनी हिट केले आहेत. तुमचं वय पाहता या वयात माणूस काहीही बोलून बसतो, नंतर त्याला पश्चाताप होतो की मी हे काय केलं. त्यामुळे १०-१५ दिवसांत माफी मागा हाच माझा तुम्हाला सल्ला आहे,” असं तो व्हिडीओमध्ये म्हणाला.

हेही वाचा – वडील सुपरस्टार, स्वतःही केले हिट चित्रपट; आता जग फिरतोय ‘हा’ अभिनेता, लोकांच्या शेतातही करतो काम

मिथुन चक्रवर्ती यांचं वक्तव्य नेमकं काय?

“त्यांची लोकसंख्या ७० टक्के आणि आमची लोकसंख्या ३० टक्के आहे. तुम्ही आम्हाला कापून भागीरथीमध्ये फेकणार असाल; पण आम्ही तुम्हाला कापून भागीरथीमध्ये नाही टाकणार. कारण- नदी आमची माता आहे; पण आम्ही तुम्हाला तुमच्या जमिनीवर फेकून देऊ,” असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिथुन यांनी तृणमूल काँग्रेसच्या हुमायू कबीर यांच्या जुन्या वक्तव्याला उत्तर देत हे विधान केलं होतं. “मी तुम्हाला भागीरथी नदीमध्ये फेकून देईल. तुम्ही फक्त ३० टक्के आणि आम्ही ७० टक्के आहोत. तुम्ही मशीद तोडत असताना मुसलमान घरात शांतपणे बसून राहतील, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चूक करताय,” असं हुमायू म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना मिथुन यांनी जे वक्तव्य केलं, त्याच वक्तव्यावरून आता त्यांना पाकिस्तानी गँगस्टरने धमकी दिली आहे.