काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ची घोषणा केली, तेव्हापासून देशभरात हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता आहे. गेले अनेक महिने विवेक अग्निहोत्री या चित्रपटावर काम करत आहेत. तर अभिनेता आर माधवनने नुकताच हा चित्रपट पाहिला आणि त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटातून जगातली पहिली कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिन तयार करण्यामागची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलघडली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर नुकतंच या चित्रपटाचं अमेरिकेत एक स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं. यावेळी अभिनेता आर माधवन उपस्थित होता. हा चित्रपट पाहून त्याचे डोकं सुन्न झाल्याचं तो म्हणाला आहे.

आणखी वाचा : “मी बीफ खायचो पण…,” विवेक अग्निहोत्रींनी केला खुलासा, म्हणाले…

आर माधवनने ट्विटरवरून या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. त्याने ट्वीट करत लिहिलं, “मी नुकताच ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट पाहिला आणि वैज्ञानिकांचा त्याग आणि यशाने माझं डोकं सुन्न झालं आहे. ज्यांनी भारतातील पहिली करोना व्हॅक्सिन बनवली आणि अत्यंत आव्हानात्मक काळात देशाला सुरक्षित ठेवलं. हा चित्रपट पाहताना तुम्ही टाळ्या वाजवता, रडता आणि जल्लोष करता. या चित्रपटातील सगळ्या कलाकारांची कामं, आपल्या भारतीय महिला शास्त्रज्ञांचा त्याग आणि धैर्य यांचं योग्य आणि प्रभावशाली चित्रण खूप सुंदर केलं आहे. तुम्ही आत्ताच #TheVaccineWar ची तिकिटं बुक करा आणि लॉकडाऊनमध्ये आपल्यासाठी ज्या महिलांनी त्याग केलाय, त्यांना सन्मान द्या.”

हेही वाचा : “राहुल गांधी खूप बेजबाबदार आहेत आणि…,” विवेक अग्निहोत्रींची टीका, म्हणाले, “ते हिंदू व मुस्लिम…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल. या चित्रपटात नाना पाटेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत तरी आज बरोबर पल्लवी जोशी, अनुपम खेर असे अनेक उत्तमोत्तम कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.