शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शाहरुखचे चाहते खूप आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत. तर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच शाहरुख खान टक्कल असलेल्या लुकमध्ये दिसणार आहे. आता त्याबद्दल त्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

काही दिवसांपूर्वी ‘जवान’ चित्रपटाचा प्रिव्ह्यू व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. त्यात पहिल्यांदाच शाहरुख टक्कल असलेला दिसला. त्याचा हा लूक पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. मग त्याचा हा लूक गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. तर आता शाहरुखनेच त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : शाहरुख खानचा ‘कार’नामा! खरेदी केली नवी कोरी रोल्स रॉयस; किंमत वाचून व्हाल आवाक्

नुकताच बुर्ज खलिफा येथे या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा संपन्न झाला. त्यावेळी शाहरुखने या चित्रपटातील त्याच्या लूक्सबद्दल सर्वांना सांगितलं. तो म्हणाला, “या चित्रपटात प्रत्येकाला खूप आवडेल अशी एक तरी गोष्ट आहेच. ॲक्शन, ड्रामा, इमोशन, गाणी, डान्स… या चित्रपटात प्रत्येकासाठी काही ना काही आहे. म्हणूनच मी या चित्रपटांमध्ये अनेक वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसेन. या चित्रपटात मी टक्कल असलेल्या लूकमध्येही दिसत आहे. जो लूक मी यापुढे कधीही करणार नाही.”

हेही वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला नवा विक्रम, प्रदर्शनाआधीच चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, त्याचा हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री नयनतारा प्रमुख भूमिकेत दिसेल तर याचबरोबर दक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणचीदेखील या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. तर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.