Anushka sharma and Virat Kohli Welcomes Baby Boy : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय फलंदाज विराट कोहली यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरुष्का लवकरच दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. अखेर आज इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने दुसऱ्यांदा आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

अनुष्का शर्माने १५ फेब्रुवारीला गोंडस मुलाला जन्म दिला. विराट-अनुष्काने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये या दोघांनी त्यांच्या बाळाचं नाव देखील सांगितलं आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या विरुष्काने त्यांच्या चिमुकल्या बाळाचं नाव अकाय (Akaay) असं ठेवलं आहे.

हेही वाचा : Video: आली समीप लग्नघटिका! जॅकी-रकुलच्या लग्नाला पोहोचली देशमुखांची धाकटी सून, पापाराझींची केली विचारपूस

विराट-अनुष्का पोस्ट शेअर करत लिहितात, “तुम्हा सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारीला आमच्या घरी चिमुकल्या ‘अकाय’चं आणि वामिकाच्या लहान भावाचं आगमन झालं. आयुष्यातील या सर्वात सुंदर प्रसंगी तुमचे आशीर्वाद व शुभेच्छा आमच्याबरोबर कायम असूद्या. याशिवाय आमच्या प्रायव्हसीचा आदर करा ही विनंती.”

हेही वाचा : Pathaan 2 Update: स्पाय युनिव्हर्सबद्दल मोठी अपडेट; किंग खानच्या ‘पठाण २’च्या शूटिंगला लवकरच होणार सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनुष्का शर्माने २०२१ मध्ये लेक वामिकाला जन्म दिला होता. लेकीच्या जन्मानंतर अभिनेत्रीने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. ती शेवटची २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात झळकली होती. गेल्या अनेक दिवसांपासून अनुष्का आई होणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. अखेर या विरुष्काने लेकाच्या जन्मानंतर पाच दिवसांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. आता लवकरच अभिनेत्री ‘चकदा एक्स्प्रेस’ या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी गोलंदाज झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र, या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.