कलाकार मंडळींची चित्रपटाच्या सेटवर होणारे वाद कायमच चर्चेत राहिले आहेत. असाच एक वाद अभिनेत्री ईशा देओल व अमृता रावमध्ये रंगला होता. ‘प्यारे मोहन’ या चित्रपटासाठी ईशा-अमृताने एकत्र काम केलं. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ईशा-अमृतामध्ये वादाची ठिणगी पडली. ईशाला अमृताचं वागणं पटलं नाही. म्हणूनच तिने सगळ्यांसमोर तिच्या कानशिलात लगावली. पण या घटनेनंतर मात्र ईशाची आई व सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी लेकीलाच पाठिंबा दिला.

आणखी वाचा – आधी आई गेली अन् १४ दिवसांनी बाबाही… ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ वेदनादायी प्रसंग

काही दिवसांपूर्वी या वादाबाबात हेमा मालिनी बोलत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ईशानेही याबाबत भाष्य केलं. ईशा म्हणाली, “जर कोणी काही चुकीचं करत असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीला सांगूनही तो ऐकत नसेल तर…” ईशा बोलत असताना हेमा मालिनींनी तिला मध्येच थांबवलं.

त्या म्हणतात, “जर कोणी चुकीचं वागत असेल आणि त्या व्यक्तीला समजावूनही ती समजत नसेल तर त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने समजावणं गरजेचं असतं.” हेमा यांच्या या वक्तव्यामुळे हे स्पष्ट होतं की त्यावेळी त्यांनी आपल्या लेकीच्या कृत्याबाबत तिला पाठिंबा दिला होता. हेमा मालिनी यांचं म्हणणं पूर्ण झाल्यानंतर ईशा पुढे म्हणते, “हे मोठे हात कधी कामी येणार.”

आणखी वाचा – Video : “२० वर्ष त्याने आमची साथ दिली अन्…” श्वानाचा मृत्यु झाल्यानंतर कॅमेऱ्यासमोरच ढसाढसा रडू लागली अभिनेत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावेळी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ईशाने म्हटलं होतं की, “दिग्दर्शक इंद्र कुमार व कॅमेऱ्यामॅनसमोर अमृताने मला चुकीची वागणूक दिली. हे प्रकरण माझ्या हाताबाहेर गेलं होतं. मी माझा स्वाभिमान व प्रतिष्ठा जपण्यासाठी काही क्षणांमध्येच तिला कानाखाली मारली. आणि मला याचा कोणताच पश्चात्ताप नाही. ती जे वागली त्यासाठी हे योग्य होतं.” ईशा-अमृताचा हा वाद त्यावेळी प्रचंड गाजला होता.