जान्हवी कपूर सध्या ‘मिस्टर अँड मिसेज माही’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिचा व राजकुमार रावचा हा चित्रपट ३१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने ती मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत तिने महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलित समाजाबद्दल मत मांडलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूर नेमकं काय म्हणाली?

‘द लल्लनटॉप’ ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी कपूर म्हणाली, “मला वाटतं की डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पाहणं खूप रंजक असेल.” त्यावर मुलाखतकाराने विचारलं की पुणे कराराच्या आधी त्यांच्यात काय बोलणं झालं होतं? त्यावर जान्हवी म्हणाली, “त्यांच्यातील एक चर्चासत्र ज्यात ते बोलतील की ते कोणत्या गोष्टीबरोबर आहेत आणि कशाप्रकारे आंबेडकरांचे व गांधींचे विचार एकाच विषयावर बदलत राहिले, त्यांनी एकमेकांवर आपला कसा प्रभाव पडला. या दोघांनी कशी मदत केली…खरं तर त्यांनी आपल्या समाजाला खूप मदत केली आहे, त्यामुळे त्यांना एकमेकांबद्दल काय वाटतं, अशा मुद्द्यांवर त्या दोघांना ऐकणं खूप मनोरंजक असेल, असं मला वाटतं.”

“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, अभिनेत्री तन्वी आझमींचं वक्तव्य; म्हणाल्या, “बंडखोरी…”

आंबेडकर व गांधी यांचे विचार

मुलाखतकार म्हणाला, गांधीजींचा आणि आंबेडकरांचा दलित समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. त्यामुळे राज्यशास्त्राच्या वर्गात आजही या विषयावर खूपच चर्चा होतात. खासकरून अस्पृश्यता व दलित याबद्दल दोघांचे विचार खूप वेगळे होते. यावर जान्हवी कपूर म्हणाली, “होय, त्यांची मतं खूपच वेगळी होती आणि मला वाटतं की आंबेडकर सुरुवातीपासूनच अतिशय स्पष्ट आणि ठाम होते, पण गांधींचे विचार हळूहळू विकसित झाले. आपल्या समाजात जी जातीयवादाची समस्या आहे, त्याबद्दल तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून माहिती मिळवणं आणि ती जगणं यात खूप फरक आहे.”

‘ती’च्याशी अफेअरची चर्चा अन् ६१ वर्षांचे संजय लीला भन्साळी अद्याप अविवाहित; एकदा म्हणालेले, “ज्यांचं लग्नाचं वय उलटून…”

घरात कधीच जातीसंदर्भात चर्चा होत नाही – जान्हवी

जान्हवीला विचारण्यात आलं की ती शाळेत असताना कधी जातीबद्दल बोललं जायचं का? त्यावर तिने नाही असं उत्तर दिलं. “माझ्या शाळेत तर नाहीच, पण घरातही कधीच जातीसंदर्भात चर्चा झालेली नाही,” असं जान्हवीने सांगितलं.

स्वतःच भांडी घासतो, वापरलेले कपडे घालतो अक्षय कुमारचा लेक; १५ व्या वर्षी आरवने सोडलं घर, अभिनेता म्हणाला, “त्याला पैसे…”

दरम्यान, जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पाहायला आवडेल असं म्हटलंय, तसेच जातीयवादाच्या समस्येवर तिचं मत मांडणं पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. मुलाखतकारही म्हणतो की जान्हवी या विषयावर बोलेल, असं अपेक्षित नसल्याने त्याला आश्चर्य वाटलं. जान्हवीला सोशल मीडियावर ‘ब्यूटी विथ ब्रेन’ म्हटलं जात आहे.