बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा १३ मे रोजी दिल्लीत साखरपुडा संपन्न झाला. परिणीतीने साखरपुड्याचे अनेक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. साखरपुड्यानंतर परिणीती आणि राघव लग्न कधी करणार आहेत याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. पण आता या दोघांनी त्यांच्या लग्नाच्या प्लॅनमध्ये मोठा बदल करायचं ठरवलं आहे.

परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा झाल्यावर त्यांचे कुटुंबीय लग्नाच्या तयारीला लागले आहेत. दिल्लीमध्ये ते राजेशाही थाटात लग्न करणार आहेत. तर आता त्या दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल…

मीडिया रिपोर्टनुसार, हे दोघं मुंबई आणि चंदिगड अशा दोन ठिकाणी लग्नानंतर रिसेप्शन देणार होते. पण आता ते फक्त गुरुग्राम येथील ‘द लीला’ हॉटेलमध्ये रिसेप्शन देणार आहेत. नुकतेच परिणीती आणि राघव यांचे आई-वडील या हॉटेलमध्ये जेवणाचा मेन्यू ठरवण्यासाठी आले होते.

हेही वाचा : परिणीतीचा शाही थाट! साखरपुड्यात अभिनेत्रीने राघव चड्ढाला घातली ‘इतक्या’ किमतीची अंगठी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणीती आणि राघव यांचे अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी दिल्लीमध्ये राहतात. त्यामुळे मुंबई आणि चंदीगडचा प्लॅन रद्द करून आता ते गुरुग्राम येथे एकच रिसेप्शन सर्वांसाठी ठेवतील. अजून त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली नाही. पण हे दोघे ऑक्टोबर महिन्यात लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.