सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान हिने तिच्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ‘केदारनाथ’ चित्रपटातून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं. तिच्या टॅलेंटच्या जोरावर तिने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. सारा अली खूपचं तिचे वडील सैफ अली खानच्याबरोबर खूप घट्ट नातं आहे. आता तिचा आणि सैफ अली खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

सारा अली खान अनेकदा सैफबरोबर दिसून येते. लहानपणीपासून सैफ अली खान तिला त्याच्या चित्रपटाच्या सेटवर घेऊन जायचा. तिथे सारा खूप छान रमायची. आता अशाच एका चित्रपटाच्या सेटवरील त्या दोघांचा एक क्युट व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सारा अगदीच एक-दीड वर्षांची दिसत आहे. तर सैफ अली खान शॉटच्यामध्ये साराची काळजी घेताना दिसत आहे.

आणखी वाचा : Video: …अन् सारा अली खान रितेश देशमुखशी चक्क मराठीत बोलू लागली, व्हिडीओ व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये सारा केशरी रंगाचा फ्रॉक आणि केसांचे दोन बो बांधून एका खुर्चीत बसलेली दिसत आहे. तर सैफ अली खान तिला बाटलीने पाणी पाजत आहे. पण सारा अली खानला ते पाणी प्यायचं नाहीये. सारा खुर्चीत बसून खेळत आहे. तर बाजूला बसलेल्या एका व्यक्तीच्या हातात तिला पुस्तक दिसतं. हे पुस्तक तिच्या हातात आल्यावर ती खूप खुश होते आणि ते पुस्तक बघण्यात दंग होऊन जाते. या व्हिडीओमध्ये सारा पुस्तक चाळताना जरी दिसत असली तरी आजूबाजूला काय सुरू आहे याकडेही तिचं बरोबर लक्ष असल्याचं दिसत आहे. सैफ अली खानच्या चित्रपटाच्या सेटवर सारा खूप एन्जॉय करताना दिसत आहे.

हेही वाचा : “तुझा बॉयफ्रेंड कोण आहे?” अखेर सारा अली खानने दिलं उत्तर, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सारा आणि सैफचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्या दोघांमधलं बॉण्डिंग पुन्हा एकदा लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत आता सर्वजण साराच्या क्युटनेसचं कौतुक करत आहेत.