मल्याळम अभिनेत्री शोभनाने नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’ मध्ये महानायक अमिताभ बच्चनबरोबर काम केलं. या चित्रपटाने १००० कोटींहून जास्त कमाई केली. शोभनाचा हा बिग बींबरोबरचा पहिला सिनेमा नाही. इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये शोभनाने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. एका चाहत्याने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव तिला विचारला. तेव्हा शोभनाने एक किस्सा सांगितला जेव्हा तिने त्यांच्याबरोबर अहमदाबादमध्ये स्टारसोबत एका गाण्याचं शूटिंग केलं होतं.

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल शोबना म्हणाली, “तेव्हापासून आतापर्यंत अमिताभ बच्चन तसेच आहेत.” आजवर ज्या कलाकारांबरोबर काम केलं, त्यांच्यापैकी सर्वात विनम्र अमिताभ बच्चन होते, असं म्हणत तिने त्याचंं कौतुक केलं. तसेच अहमदाबादमध्ये त्यांच्याबरोबर शूटिंग केलं होतं, तेव्हाचे दिवस आठवले. तिने चित्रपटाचे किंवा गाण्याचे नाव सांगितले नाही.

शोभना म्हणाली, “मी बच्चन सरांबद्दल एक किस्सा सांगेन जेव्हा मी अनेक वर्षांपूर्वी अहमदाबादमध्ये त्यांच्याबरोबर एका गाण्याचं शूटिंग केलं होते. या गाण्यासाठी, माझ्याभोवती खूप कपडे गुंडाळले होते. बच्चन सरांना पाहण्यासाठी अहमदाबादमध्ये गर्दी झाली होती, त्यांच्यासाठी व्हॅन होती. मी विचारलं, ‘माझी व्हॅन कुठे आहे’ कारण मला बरेचदा कपडे बदलायचे होते… सेटवर कोणीतरी अचानक म्हणालं, ‘ती केरळची आहे, ती करेल सगळं अ‍ॅडजस्ट आहेत, ती झाडामागे कपडे बदलू शकते.’”

अमिताभ बच्चन यांनी ते ऐकलं अन्…

ती पुढे म्हणाली, “बच्चन सरांनी हे वॉकी टॉकीवर ऐकलं आणि ते लगेच बाहेर आले आणि ओरडले, ‘कोण म्हणालं हे?’ आणि मग त्यांनी मला त्यांच्या व्हॅनमध्ये बोलावलं आणि ते बाहेर पडले. तेव्हापासून आता ‘कल्की’मध्ये काम केलं तेव्हाही ते खूप चांगले वागले. चेहऱ्यावर इतका जड मेकअप असूनही कोणी त्यांना भेटायला आलं की ते उठून त्यांना भेटायचे. मी त्यांना म्हटलं, ‘सर, तुम्ही सर्वांना अभिवादन करण्यासाठी उठण्याची गरज नाही.’ आणि ते म्हणाले, ‘पण त्याची मला सवय झाली आहे.’”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कल्की २८९८ एडी’मध्ये शोभनाने मरियमची भूमिका साकारली होती. तर अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामा हे पात्र साकारले होते. प्रभास, दिशा पटानी आणि कमल हासनसह अनेक कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने जगभरात १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. हा २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. निर्माते सध्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तयारी करत आहेत.