अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष एका खास कारणामुळे तिच्याकडे वळलं आहे.

काल दसरा निमित्त अनेक सेलिब्रिटींनी नव्या घोषणा केल्या. काहींनी आगामी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित, केलं तर काहींनी नवीन घर घेतल्याचं सांगितलं. तर काल दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रद्धा कपूरने स्वतःला एक खास भेट दिली आहे. तिने काल आलिशान गाडी खरेदी केली.

mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?

आणखी वाचा : चाहत्याने श्रद्धा कपूरला मराठीतून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, कमेंट वाचताच अभिनेत्री म्हणाली…

काल तिने ज्या शोरूम मधून तिची नवीन गाडी खरेदी केली त्यांनी श्रद्धाचे गाडी खरेदी करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. कार शोरूम ऑटोमोबिली आर्डेंट इंडियाने या त्यांच्या पोस्टमधून श्रद्धाने नवीन लॅम्बोर्गिनी खरेदी केल्याची बातमी शेयर केली आहे. त्यांनी श्रद्धाचे शोरूम मधील फोटो शेअर करत लिहिलं, “काही वेगळं नाही, श्रद्धा कपूरने नुकतीच हुराकन टेक्निका खरेदी केली. ती कदाचित बॉलीवूडमधील सर्वात मोठी अभिनेत्री नसेल पण श्रद्धा ही त्या कलाकारांपैकी एक आहे जी खूप वेगळी आहे आणि आता तिला ही Rosso Anteros Lamborghini Huracan Tecnica घरी नेताना बघणं खूप छान वाटलं.

हेही वाचा : “लग्न कधी करणार?” चाहत्याच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरने दिलं भन्नाट उत्तर, अभिनेत्रीची कमेंट चर्चेत

श्रद्धाची ही लॅम्बोर्गिनी लाल रंगाची असून ती या फोटोंमध्ये तिच्या नवीन कारसोबत पोज देताना दिसत आहे. श्रद्धाच्या या कारची किंमत ४.०४ कोटी आहे. मिडिया रिपोर्टनुसार, याआधी श्रद्धाने BMW 7 खरेदी केली होती ज्याची किंमत २.४६ कोटी होती. त्याचबरोबर तिच्याकडे मर्सिडीज बेंझ जीएलई कारही आहे ज्याची किंमत १.०१ कोटी रुपये आहे. तर आता तिच्या या गाड्यांच्या ताब्यात लॅम्बोर्गिनीचा समावेश झाला आहे.