दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सध्या चर्चेत आहे. त्याचा ‘आदिपुरुष’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रविवारी रात्री प्रदर्शित झाला. चित्रपटाची संपूर्ण टीम या प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्यामध्ये पोहोचली होती. दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा दुसरा हिंदी चित्रपट, याआधी त्याने अजय देवगणबरोबर तान्हाजी हा चित्रपट केला होता. या चित्रपटाला ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वात्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार मिळाला. ‘तान्हाजी’नंतर ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची घोषणा केली.

आदिपुरुषच्या टीझरबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. मात्र हा टिझर प्रदर्शित होण्याआधी चित्रपटाचा अभिनेता प्रभास माध्यमांशी बोलताना असं म्हणाला की ‘मी थोडा घाबरलो होतो. कारण या चित्रपटात मी प्रभू श्रीरामांची भूमिका करत आहे. मी ओम राऊतला फोनदेखील केला होता की माझ्याकडून कोणती चूक झाली तर.. आम्ही हा चित्रपट खूप प्रेमाने, आदराने आणि भीतीने बनवला आहे. प्रभू श्रीराम आम्हांला आशीर्वाद देवो, अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती’.

Adipurush teaser : “अधर्माचा नायनाट…” प्रभासच्या बहुचर्चित चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

प्रभासने बाहुबली चित्रपटातून आपली छाप पाडली होती, त्यानंतर साहो’ आणि ‘राधेश्याम’ असे दोन बिगबजेट चित्रपट केले. या दोन्ही चित्रपटांना अपेक्षित प्रमाणामध्ये यश मिळाले नाही. आता त्याच्या चाहत्यांना आदिपुरुष चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटावर संपूर्ण टीमने मेहनत घेतली आहे. करोना महामारीमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण रखडले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात प्रभासच्या व्यतिरिक्त क्रिती सेनॉन ही जानकीच्या आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. मराठमोळा देवदत्त नागे देखील या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण पात्र साकारले आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार, राजेश नायर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. पुढच्या वर्षी १२ जानेवारीला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे.