अभिनेत्री अदिती राव हैदरी बॉलिवूडमधील सुंदर व प्रतिभाशाली अभिनेत्री आहे. तिने फक्त हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू व मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे. हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या तुलनेत दक्षिणेतील चित्रपट निर्मात्यांनी अदिती राव हैदरीच्या प्रतिभेचा चांगला वापर केल्याची गेले काही दिवस चर्चा होती. त्यावर अदितीने प्रतिक्रिया दिली आहे.

Oscar 2023 मध्ये लाइव्ह सादर केलं जाणार ‘नाटू नाटू’ गाणं; अकादमीने ट्वीट करून दिली माहिती

अदितीने तिच्या करिअरमध्ये हिंदी चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जास्त काम केलं आहे. अशातच आपल्याला हिंदी चित्रपट निर्मात्यांकडून जास्त ऑफर न मिळाल्याबद्दल काळजी वाटत नाही, असं अदितीने सांगितलं. ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान अदितीला विचारण्यात आलं की, हिंदी चित्रपट निर्माते दक्षिणेप्रमाणे तिच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करू शकले नाहीत, असं तिला वाटतं का? त्यावर “मी हे खूपदा ऐकलं आहे,!” असं ती म्हणाली.

Video: अदिती राव हैदरी व सिद्धार्थ लग्न करणार? अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर सेलिब्रिटींच्या कमेंट्स चर्चेत

यादरम्यान, ‘ताज-डिव्हाइड बाय ब्लड’मध्ये अदितीचे सहकलाकार असलेल्या नसीरुद्दीन शाहांनीही प्रतिक्रिया दिली. “कदाचित तमिळ आणि मल्याळम निर्माते जास्त हुशार आहेत. अदितीसारख्या व्यक्तीला काळजी करण्याचं कारण नाही, लवकरच किंवा काही काळाने ते तिच्याकडे येतीलच,” असं शाह म्हणाले.

अदितीने सांगितलं की हिंदी चित्रपट निर्माते तिला दाक्षिणात्य निर्मात्यांप्रमाणे रोमांचक भूमिका देत नाहीत, पण याचा तिला फारसा फरक पडत नाही. “मी अनेक लोकांना पाहिलं आहे, ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये खरोखरच खूप चांगलं काम केलंय. जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा लहान मुलगी म्हणून माझं स्वप्न मणिरत्नम यांच्या चित्रपटातील हिरोईन बनण्याचं होतं. मला माहीत होतं की मला तमिळ बोलावं लागेल, कारण ती त्यांची भाषा आहे आणि एक तमिळ चित्रपट बनवताना त्यांना खूप आनंद होईल,” असं अदिती म्हणाली.

अकबराबद्दल शिकवलेला इतिहास मूर्खपणाचा; नसीरुद्दीन शाहांचं स्पष्ट मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “खरं तर मी अशा कुटुंबातून आले आहे, जिथे माझी आई, आजी सर्व उत्तम कथाकार आहेत. मोठं होताना मला समजलं की भाषा, जात, धर्म, काहीही कथेच्या आड येत नाही. कथा ही भावनांबद्दल असते आणि ती तुम्हाला एका विशिष्ट प्रकारचा अनुभव देते,” असं मत अदितीने व्यक्त केलं.