अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर यांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. 'आशिकी २' या चित्रपटात श्रद्धा-आदित्यची जोडी पहिल्यांदा एकत्र झळकली होती. 'ओके जानू' चित्रपटानंतर या जोडीला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. अशातच आदित्य-श्रद्धाचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेही वाचा : शिव ठाकरेला VIP रांगेतून लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याची खंत, म्हणाला, “जे लोक काही तास रांगेत थांबलेले असतात…” श्रद्धा आणि आदित्य दोघेही एकाच वेळी टी-सीरिजच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. यावेळी पापाराझींनी आदित्यला श्रद्धाही त्याठिकाणी उपस्थित असल्याचं सांगितलं. भेट झाल्यावर दोघांनीही हसत एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांची विचारपूस केली. दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हेही वाचा : लता मंगेशकरांच्या जयंतीनिमित्त गायिका सावनी रविंद्रने शेअर केली खास पोस्ट; म्हणाली… आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर 'आशिकी २' नंतर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतु, २०१५ मध्ये एका मुलाखतीत, "आम्ही दोघंही एकमेकांचे चांगले मित्र आहोत आणि कायम राहू." असं श्रद्धाने म्हटलं होतं. हेही वाचा : “तुम्ही आहातच इथे…” लतादीदींसाठी सलील कुलकर्णी यांची खास पोस्ट; जुना फोटो शेअर करत म्हणाले… दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी "आदित्य-श्रद्धा लवकर एकत्र चित्रपट करा", "अनन्या का मध्ये आली?" अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत. सध्या आदित्य रॉय कपूर स्टारकिड अनन्या पांडेला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघांचेही स्पेनमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.