शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाकडे सध्या सगळयांचंच लक्ष लागलं आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. परदेशात या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता भारतातही या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची सुरुवात झाली आहे. अवघ्या काही तासांतच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून भारतात दमदार कमाई केली आहे.

‘पठाण’ या चित्रपटासाठी शाहरुखचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. नुकतीच आपल्या देशात या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली. या ॲडव्हान्स बुकिंगला देशभरात तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीची एकूण ३ लाख २० हजार तिकीटं विकली गेली होती. यात सर्वाधिक तिकीटं या चित्रपटाच्या हिंदी आणि तेलुगू व्हर्जनची विकली गेली.

आणखी वाचा : ‘पठाण’ चित्रपट पाहा फक्त ५५ रुपयांत, जाणून घ्या कधी आणि कुठे मिळतील तिकिटं

या चित्रपटाने भारतात ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये १४.६६ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून ४ दिवस बाकी आहेत. त्यामुळे या चार दिवसात हा आकडा अधिक वाढेल असं बोललं जात आहे. त्याचबरोबर प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी प्रजासत्ताक दिन असल्याने त्यादिवशी हा चित्रपट मोठा गल्ला जमवेल याची खात्री अनेकांना वाटत आहे.

हेही वाचा : “कमी शिकलेले लोक…” ‘पठाण’ला पाठिंबा देत हनी सिंगचं मोठं वक्तव्य, ए. आर. रहमान यांच्या नावाचाही उल्लेख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटातून शाहरुख मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर परतताना दिसणार आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करताना दिसणार आहे.