यावर्षी भारतीयांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली आहे. एकीकडे पाकिस्तानवर भारताने टी २० सामन्यात विजय मिळवला आहे तर दुसरीकडे भारतीय वंशाचे नागरिक आणि ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे. देशातूनच नव्हे तर जगभरातुन ऋषी सुनक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. ऋषी सुनक पंतप्रधानपदी विराजमान झाले खरे मात्र अक्षय कुमारला ट्विटवर ट्रोल केले जात आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार वर्षाला ४ ते ५ चित्रपट करतो. बॉलिवुडमधील सर्वात महागडा आणि व्यस्त अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. आता ट्विटवर इतकंच नाही तर सोशल मीडियावर याविषयीच्या अनेक ट्विटबरोबरच खूप मजेशीर मीम्सही व्हायरल होत आहेत. ऋषी सुनक यांच्या बायोपिकची चर्चाही जोर धरू लागलीआहे.

Photos : लग्नानंतरदेखील बोल्ड सीन्स देण्यासाठी कचरल्या नाहीत ‘या’ अभिनेत्री! पाहा फोटो

ट्विटवर अनेकांनी ऋषी सुनक यांच्या बायोपिकसाठी अक्षय कुमारची निवड व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर त्याच्या ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटाची एक व्हिडिओ क्लिपही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो काही ब्रिटीशांना भारतीय संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल सुनावत आहे. नेटकऱ्यांच्या मते अक्षय कुमार या बायोपिकसाठी उत्तम शोभेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काहींच्या मते सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि जिम सराब या अभिनेत्यांचा विचार करावा अशी मागणी केली आहे. मात्र या फक्त चर्चा आहेत. दरम्यान ऋषी सुनक आणि आशिष नेहरा या दोघांचा चेहरा काहीसा सारखा दिसतो त्यांच्या चेहऱ्यामधील समानता असल्यामुळे त्या दोघांवरचे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ब्रिटनमध्ये जन्मलेले ऋषी सुनक भारताचे जावई आहेत. २००९ मध्ये त्यांनी इन्फोसिस या आयटी कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या मुलीशी, अक्षताशी लग्न केले.