हिंदी चित्रपटातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता अजय देवगण व अभिनेत्री तब्बू यांची जोडी. आता ही जोडी पुन्हा एकदा चित्रपटगृहात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. अजय देवगण व तब्बूचा आगामी चित्रपट ‘औरों में कहां दम था’ प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येत आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला असून अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

“दुश्मन थे हमीं अपने…”, असं कॅप्शन देत अभिनेता अजय देवगणने ‘औरों में कहां दम था’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये शायरी बोलत अजय देवगणची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळत आहे. ‘जब दिल से धुआं उठा, बरसात का मौसम था…सौ दर्द दिए उसने जो दर्द का मरहम था, हमने ही सितम ढाए-हमने ही कहर तोडे…दुश्मन थे हमी अपने, औरों में कहां दम था!’ ही शायरी टीझरमध्ये अजय म्हणतात दिसत आहे. टीझरची सुरुवात होळीने होते आणि त्यानंतर शेवट जेल बाहेर होतो. होळीच्या सीनमध्ये अजय व तब्बूची भेट होताना दाखवण्यात आली आहे. ‘औरों में कहां दम था’ चित्रपटाच्या या टीझरमध्ये अजय व तब्बूला एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच दोघांची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – हाडा मांसाचे कलाकार घ्या,” मालिकेत AIच्या वापराबद्दल संतापली मराठी अभिनेत्री? म्हणाली, “कलाकार अजून जिवंत…”

हेही वाचा – “प्रेम ट्रेनमध्ये चढताना हुकलेल्या संधीसारखं,” समीर चौघुले घेऊन येतायत ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’, जाणून घ्या नव्या कार्यक्रमाबद्दल

५ जुलैला प्रदर्शित होणारा ‘औरों में कहां दम था’ चित्रपटात अजय देवगण व तब्बूसह महेश मांजरेकरांची मुलगी सई मांजरेकर झळकणार आहे. याशिवाय शांतनु माहेश्वरी, जिमी शेरगिल महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. टीझरमध्ये प्रमुख कलाकारांव्यतिरिक्त कोणत्याही इतर कलाकारांची झलक दाखवण्यात आलेली नाही.

हेही वाचा – Video: मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाल्या सुप्रिया पाठारे, लोकांना आवाहन करत म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ए वेडनेसडे’, ‘बेबी’ आणि ‘स्पेशल २६’ सारखे थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘आरआरआर’ चित्रपटासाठी ऑक्सर जिंकणारे एम.एम. कीरावानी यांनी अजय व तब्बूच्या चित्रपटाचं म्युझिक केलं आहे.