बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्स विविध ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमध्ये झळकतात. अक्षय कुमार, रणवीर सिंग शाहरुख खान, अजय देवगण, टायगर श्रॉफ हे कलाकार पान मसाल्याची जाहिरातही करताना दिसतात. या अभिनेत्यांपाठोपाठ तरुणाईत प्रचंड लोकप्रिय असलेला अभिनेता कार्तिक आर्यन यालाही अशा एका जाहिरातीची विचारणा करण्यात आली होती, पण त्याने ती जाहिरात नाकारली. त्यानंतर हीच पान मसाल्याची जाहिरात आता अभिनेता अक्षय कुमार करताना दिसणार आहे.

आणखी वाचा : उणे १६ तापमान असलेल्या खोलीतून कशी बाहेर पडणार जान्हवी कपूर?, ‘मिली’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

कार्तिक आर्यनला एका पान मसाल्याची जाहिरात करण्यासाठी १५ कोटींची ऑफर देण्यात आली होती. ‘ई टाईम्स’च्या वृत्तानुसार, अजय देवगण शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांच्याआधी निर्मात्यांनी कार्तिक आर्यनला या जाहिरातीबद्दल विचारणा करण्यात आली होती. त्यासाठी त्याला १५ कोटी ही मोठी रक्कमही मिळणार होती. परंतु आरोग्याला हानिकारक असलेल्या कोणत्याही पदार्थांची जाहिरात करणार नाही, असे म्हणत कार्तिकने ही जाहिरात नाकारली. त्यानंतर जाहिरातीच्या निर्मात्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा अक्षय कुमारकडे वळवला. कार्तिक आर्यनने नाकारलेल्या या ऑफरला अक्षय कुमारनी होकार दिला आहे. त्यामुळे अक्षय कुमार पुन्हा एकदा पान मसाल्याची जाहिरात करताना दिसणार आहे.

या जाहिरातीच्या निर्मात्यांना या जाहिरातीत ए-लिस्टमधील आणखी एक स्टार हवा होता. यावेळी तरुण स्टार घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी कार्तिक आर्यनला १५ कोटींची ऑफर देऊन अजय देवगण आणि शाहरुख खानबरोबर काम करण्याची ऑफर दिली. मात्र कार्तिकने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर जाहिरात निर्मात्यांनी अक्षयशी संपर्क साधला.

हेही वाचा : ‘आशिकी ३’ मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची वर्णी; कार्तिक आर्यनसह पडद्यावर रोमांस करताना दिसणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कार्तिक आर्यनकडे ‘शहजादा’, ‘फ्रेडी’ आणि ‘सत्य प्रेम की कथा’ हे चित्रपट आहेत. याशिवाय कबीर खानचा ‘स्ट्रीट फायटर’ आणि हंसल मेहता यांच्या ‘कॅप्टन इंडिया’मध्येही तो दिसणार आहे.