Akshay Kumar’s Comment On Katrina Kaif’s Post : कतरिना कैफ व विकी कौशल हे बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. दोघांनी नुकतीच त्यांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची बातमी सगळ्यांबरोबर शेअर केली आहे. मंगळवारी (२३ सप्टेंबर) कतरिनानं सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नन्सीची न्यूज शेअर केली. त्यानंतर इंडस्ट्रीतील अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
कतरिना व विकी कोशल यांनी ते लवकरच आई-बाबा होणार असल्याचं सांगत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यावेळी कतरिनानं फोटोला खास कॅप्शनही दिली. तिच्या पोस्टखाली बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा, शर्वरी वाघ, मृणाल ठाकूर, आयुष्मान खुराना, वरुण धवन, रोहित शेट्टी यांसारख्या अनेकांनी कमेंट्स करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
अक्षय कुमारने विकी कौशल-कतरिना कैफला दिला सल्ला
इतर बॉलीवूड सेलिब्रिटींप्रमाणेच अक्षय कुमारनंही कमेंट्स करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु, यासह त्यानं दोघांना एक खास सल्लाही दिला. अक्षयनं कतरिनाच्या पोस्टखाली कमेंट करीत, “कतरिना आणि विकी मी तुम्हा दोघांसाठी खूप आनंदी आहे. जेवढं मी तुम्हाला ओळखतो, त्यानुसार मला माहीत आहे की, तुम्ही दोघेही खूप चांगले पालक व्हाल; पण बाळाला इंग्रजीबरोबर पंजाबीसुद्धा तितक्याच आवडीनं शिकवा. खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद जय महादेव,” असा खास सल्ला दिला आहे.
अक्षय कुमारनं विकीबरोबर अलीकडेच ‘केसरी २’ या चित्रपटात काम केलेलं. तर अक्षयने कतरिनाबरोबर यापूर्वी अनेक चित्रपटांत काम केलं आहे. त्यांनी ‘नमस्ते लंडन’, ‘सूर्यवंशी’, ‘वेलकम’, ‘दे दना दन’, ‘ब्लू’, ‘सिंग इज किंग’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे. या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.
दरम्यान, अक्षय सध्या त्याच्या ‘जॉली एलएलबी ३’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळतं. तर, विकी कोशल त्याच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यामध्ये तो रणबीर कपूर व आलिया भट्टबरोबर झळकणार आहे. त्याव्यतिरिक्त अभिनेता त्याच्या इतर काही आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणातही व्यग्र आहे.