scorecardresearch

Video : अक्षय कुमार साईबाबांच्या चरणी; शिर्डीमध्ये जाऊन घेतलं साई समाधीचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल

अक्षय कुमारने घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video : अक्षय कुमार साईबाबांच्या चरणी; शिर्डीमध्ये जाऊन घेतलं साई समाधीचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल
अक्षय कुमारने घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अलिकडच्या काही वर्षांमध्ये अक्षय कुमारचे प्रदर्शित झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरले. अक्षयच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी अक्षरशः पाठ फिरवली. आता त्याचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सेल्फी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान अक्षयचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – शाहरुख खानचा ‘पठाण’ प्रदर्शित होताच बॉलिवूडवर भडकली कंगना रणौत, म्हणाली, “चित्रपटसृष्टीचा दर्जा…”

‘सेल्फी’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अक्षयने शिर्डीमध्ये जाऊन साई समाधीचे दर्शन घेतलं. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचं शर्ट व पँट परिधान केली होती. साई समाधीसमोर हात जोडत त्याने नमस्कार केला. अक्षय जेव्हा या मंदिरात पोहोचला तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

नुकताच त्याचा ‘सेल्फी’ चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याने शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचा आर्शिवाद घेतला. याधीही बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींनीही शिर्डीमध्ये हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वीच रवीना टंडनही शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आली होती.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘पठाण’मुळे रितेश देशमुखच्या ‘वेड’सह इतर मराठी चित्रपटांना फटका बसणार? थिएटर मिळत नसल्याच्या चर्चा

अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षयबरोबर इमरान हाशमी मुख्य भूमिकेत काम करताना दिसेल. तसेच या चित्रपटाच्यानिमित्ताने इमरान बऱ्याच वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 18:11 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या