आलिया भट्टने नुकताच ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. या सोहळ्याला अभिनेत्रीसह तिचा नवरा रणबीर कपूरदेखील उपस्थित होता. प्रथमच राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यावर आलियाने स्वत:साठी एक महागडी आलिशान गाडी खरेदी केली आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : सायली मागणार अर्जुनची माफी, सुभेदारांच्या घरात काय घडणार? जाणून घ्या…

आलियाने भट्टच्या नव्या गाडीचा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे. अभिनेत्रीने रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी लाँग व्हीलबेस (LWB) गाडी खरेदी केली आहे. या गाडीची किंमत जवळपास ३ कोटी ८१ लाख एवढी आहे. आलियाच्या या नव्या गाडीचे फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : Video: गोष्ट पडद्यामागची: ‘शोले’ला टक्कर देत बॉक्स ऑफिसवर ‘जय संतोषी माँ’ने रचलेला इतिहास

आलियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अलीकडेच आलियाने गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांच्यासह ‘हार्ट ऑफ स्टोन’ चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलीवूडमध्ये ती शेवटची ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकली होती. याशिवाय अभिनेत्री आगामी काळात ‘जिगरा’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा : Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’मधील मनारासाठी प्रियांका चोप्राची खास पोस्ट, शेअर केला जुना फोटो, काय आहे दोघींचं नातं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलियाचा बहुचर्चित ‘जिगरा’ चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच आलिया फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्ये कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासह काम करणार आहे. चित्रपटाची घोषणा करून दोन वर्ष उलटल्यानंतरही अभिनेत्रीच्या व्यग्र वेळापत्रकामुळे याच्या शूटिंगला अद्याप सुरूवात झालेली नाही.