कलाकार मंडळी नवीन वर्षाचं जोरदार स्वागत करत आहेत. सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना नव वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबरीने आपल्या जवळच्या मंडळींबरोबर तसेच नातेवाईक, मित्र-परिवाराबरोबर एकत्रित वेळ घालवताना दिसत आहेत. आलिया भट्ट व रणबीर कपूरनेही कुटुंबिय तसेच मित्र परिवाराबरोबर नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे.

आलिया व रणबीर सध्या आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत एण्जॉय करताना दिसत आहेत. मुंबईमधील वास्तू या त्यांच्या घरी आलिया व रणबीरने हाऊस पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी आदित्य रॉय कपूर, रोहित धवन, जान्हवी धवन यांनीही या पार्टीला हजेरी लावली होती.

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये लूज पायजमा व शर्टमध्ये दिसत आहे. तर या मंडळींच्या पुढ्यात दारूचे ग्लास दिसत आहेत. आलिया व रणबीरचं लग्न याच घरामध्ये झालं. या दोघांनी नवीन वर्षाचं सेलिब्रेशनही घराच्या गॅलरीमध्ये केलं आहे.

आणखी वाचा – Video: बोल्ड ड्रेस, दारूचा ग्लास अन्… न्यासा देवगणचा सेलिब्रेशन व्हिडीओ पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी त्यांनी गॅलरीमध्ये विशेष सजावट केली असल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. तर आलियाच्या क्युट लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मात्र या फोटोमध्ये आलिया व रणबीरची लेक राहाची झलक मात्र पाहायला मिळाली नाही. चाहत्यांनी या सेलिब्रिटी कपलला नवीन वर्षाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.