दीड महिन्यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या घरी छोटी परी म्हणजेच आलिया रणबीरची मुलगी ‘राहा’चं आगमन झालं. तेव्हापासून आलिया मातृत्वाचा आनंद घेत आहे. आई झाल्यानंतर अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते. तसंच त्या फोटोंमधून ती मातृत्व कशी एन्जॉय करतेय हे चाहत्यांशी शेअर करत असते. नुकतंच तिने पुन्हा एकदा वर्कआउट आणि योगा करायला सुरुवात केली. याचं मुख्य कारण म्हणजे ती लवकरच कामावर परतणार आहे.

आलियाच्या गरोदरपणात ती बाळाच्या जन्मानंतर वर्षभर तरी काम करणार नाही, ती वर्षभर कामापासून ब्रेक घेणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आलियाने वेगळाच विचार केला आहे. राहाच्या जन्माच्या तीन महिन्यानंतरच ती नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

आणखी वाचा : महेश भट्ट लाडक्या नातीला देणार ‘ही’ खास भेट, खुलासा करत म्हणाले, “मी या जगात नसल्यावरही राहा…”

आलिया फरहान अख्तरच्या आगामी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार होती. गरोदरपणा नंतर ते थेट याच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल असंही बोललं गेलं. मात्र आता ती फरहान अख्तर च्या नव्हे तर संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

‘इ टाइम्स’च्या वृत्तानुसार, आलिया भट्ट फेब्रुवारीमध्ये ‘बैजू बावरा’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनत आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’च्या अभूतपूर्व यशानंतर आलियाचा भन्साळीसोबतचा हा दुसरा चित्रपट आहे.

हेही वाचा : “माझी सून फारच…” आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलल्या नीतू कपूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गंगूबाई काठियावाडी सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे दिल्यानंतर संजय लीला भन्साळी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बैजू बावरामध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात बरीच गाणी आहेत. भन्साळींनी ‘बैजू बावरासाठी’ १२-१५ गाणी रेकॉर्ड केली आहेत असंही समोर आलं आहे. संजय लीला भन्साळी यांना अनेक वर्षांपासून ‘बैजू बावरा’ बनवण्याची इच्छा होती आणि अखेर या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढील वर्षी सुरुवात होणार आहे. ‘बैजू बावरा’ची स्टारकास्ट जवळपास निश्चित झाली आहे. संजय लीला भन्साळी यांनी अभिनेता रणवीर सिंग याला या चित्रपटासाठी साइन केले आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी आणखी एका अभिनेत्रीला साईन करणार आहेत. आलिया-रणवीरचा हा चित्रपट २०२३ च्या अखेरीस किंवा २०२४ च्या पूर्वार्धात प्रदर्शित होईल असं बोललं जात आहे.