Alia Bhatt Video Cannes Film Festival: आलिया भट्टने ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील तिच्या लूकचे चाहत्यांकडून मोठे कौतुक झाले. आलिया भट्टचे कान्समधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळाले.

आता मात्र आलिया भट्ट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आलिया भट्ट जेव्हा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये फोटोसाठी पोज देत होती, त्यावेळी तिच्या गळ्यातील नेकलेस तुटला. मात्र, अभिनेत्रीने त्यानंतर जे काही केले, त्याचे कौतुक होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री रेड कार्पेटवर फोटोसाठी पोज देण्यासाठी उभी आहे. आत्मविश्वासाने आलिया पोज देताना दिसत आहे. मात्र, तितक्यात तिच्या गळ्यातील नेकलेस तुटतो. आलियाला त्याची जाणीव होते. एका हाताने ती तो नेकलेस तसाच धरते आणि फोटोसाठी पोज देते. तिच्या चेहऱ्यावर जराही गोंधळल्याचे भाव दिसत नाहीत. आता सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा होताना दिसत आहे.

आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अभिनेत्रीच्या कृतीचे नेटकरी कौतुक करताना दिसत आहेत. द जेंटलमन या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला राणी राणी हे गाणेदेखील लावले आहे.

नेटकरी काय म्हणाले?

या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “ती आलिया आहे, ती क्वीन आहे, ती काहीही करू शकते”; दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “आलियाचा अभिमान वाटतो”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “राणी राणी हे गाणे तिच्यासाठीच बनले आहे”, तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “आलियाने खूप आत्मविश्वासाने ती परिस्थिती हाताळली”, अशा अनेक कमेंट करीत चाहत्यांनी आलियाचे कौतुक केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आलिया भट्ट ही तिच्या एकापेक्षा एक चित्रपटांसाठी ओळखली जाते. आलियाने ‘स्टुंडट ऑफ द इअर’ या चित्रपटातून २०१२ साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘हायवे’, ‘२ स्टेट्‍स’, ‘कपूर अँड सन्स’, ‘कलंक’,’डिअर जिंदगी’, ‘गली बॉइज’, ‘गंगुबाई काठियावाडी’, अशा अनेक चित्रपटांत काम करत तिने तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे.