बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत. या जोडप्याने घटस्फोट घेतला आहे, अशा चर्चांदेखील झालेल्या पाहायला मिळाल्या. सध्या अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर हे रिलेशनशिपमध्ये आहेत, या चर्चांना उधाण आले आहे. या सगळ्यात अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्रीला लिहिलेले पत्र झाले व्हायरल

इन्स्टंट बॉलीवूडने इन्स्टाग्रामवर अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला लिहिलेले पत्र शेअर केले आहे. ‘दसवी’ या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांनी स्क्रीन शेअर केली होती. त्यावेळी निम्रत कौरच्या अभिनयाची प्रसंशा करणारे पत्र बिग बींनी लिहिले होते. या पत्रात लिहिलेला मजकूर असा आहे, “आपण क्वचितच भेटलो किंवा बोललो आहे. याआधी वायआरएफच्या एका कार्यक्रमात मी तुझे कॅडबरीच्या जाहिरातीसाठी कौतुक केले होते. मात्र, ‘दसवी’ चित्रपटात ज्या पद्धतीने तू काम केले आहेस ते उल्लेखनीय, अपवादा‍त्मक आहे. मी तुझे मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो.”

आता या पत्राचा आणि अभिषेक बच्चन-निम्रत कौर यांच्या नात्याचा संबंध लावला जात आहे. ‘दसवी’ चित्रपटानंतर अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांनी अनेक मुलाखती दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी रिलेशनशिपवर केलेल्या वक्तव्याचीदेखील मोठी चर्चा झाली. सध्या तो व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
इन्स्टाग्राम

गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्या राय यांच्यातील संबंध ठीक नसल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर अनंत अंबानीच्या लग्नात ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची लेक आराध्या यांनी एकत्र हजेरी लावली, तर दुसरीकडे संपूर्ण बच्चन कुटुंबाने एकत्र एन्ट्री केली. बच्चन कुटुंबाबरोबर ऐश्वर्या राय आणि आराध्या का नव्हते, असा प्रश्न चाहत्यांना पडला. अभिषेक बच्चन ऐश्वर्याबरोबर का आला नाही, असेही म्हटले जाऊ लागले. या कार्यक्रमातील फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्याचा घटस्फोट झाला आहे, अशा चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या.

हेही वाचा: ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री! पोस्ट शेअर करत सांगितलं नव्या भूमिकेचं नाव, म्हणाला…

सध्या या सर्व चर्चा होत असल्या तरीही बच्चन कुटुंब, अभिषेक बच्चन, निम्रत कौर आणि ऐश्वर्या राय यांनी या सगळ्याबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही.