बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांचे ट्वीट, ब्लॉग व फेसबुक पोस्ट चर्चेत असतात. पण अचानक बिग बींचे १३ वर्षे जुने एक ट्वीट व्हायरल झाले आहे. या ट्वीटवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. हे ट्वीट महिलांच्या अंतर्वस्त्राबद्दल आहे.

सेटवर २०० लोक, शुटिंग सुरू असतानाच शिरला बिबट्या अन्…; मराठी मालिकेच्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल

बिग बींनी हे ट्वीट १३ वर्षांपूर्वी म्हणजेच १२ जून २०१० रोजी केलं होतं. “इंग्रजी भाषेत ‘ब्रा’ एकवचनी आणि ‘पँटीज’ अनेकवचनी का आहे,” असं अमिताभ बच्चन यांनी केलेलं ट्वीट होतं. हे ट्वीट पुन्हा एकदा व्हायरल झालं असून नेटकरी त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आहेत.

“चांगला प्रश्न आहे बच्चनसाहेब, KBC च्या पुढच्या सिझनमध्ये हा प्रश्न नक्की विचारा,” असं एका युजरने म्हटलंय.

“ही शंका आज दूर व्हायलाच हवी,” असं दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे.

“तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती,” असं ट्वीट एका युजरने केलं आहे.

“हा प्रश्न केबीसीमध्ये ५ कोटी रुपयांसाठी विचारा सर,” असं एका युजरने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कामाबद्दल बोलायचे झाल्यास अमिताभ बच्चन अखेरचे ‘उंचाई’ आणि ‘गुडबाय’ या चित्रपटात दिसले होते. लवकरच ते टायगर श्रॉफसोबत ‘गणपत’, प्रभास आणि दीपिकासोबतचा ‘कल्की 2898 एडी’ आणि ‘द इंटर्न’च्या रिमेकमध्ये दिसणार आहेत.