महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री अनुष्का चोप्राचा बाईक राईडचा व्हिडीओ सोमवारी प्रचंड व्हायरल झाला होता. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाच्या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागितली. तर, दुसरीकडे जुहू परिसरात झाड कोसळल्याने अभिनेत्री अनुष्का शर्माने बॉडीगार्डसह दुचाकीने प्रवास केला. परंतु बाईकने प्रवास करताना या दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्यांच्यावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला.

हेही वाचा : “तरच लग्नानंतर आनंदी…” अभिषेक बच्चनने कतरिनाशी लग्न करण्यापूर्वी विकीला दिला होता सल्ला

अमिताभ आणि अनुष्का दोघांनीही बाईक राईड करताना हेल्मेट घातले नव्हते. अनुष्काच्या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी ‘हेल्मेट कुठे घातले आहे?’ मुंबई पोलीस कृपया याची दखल घ्या!” तसेच काही युजर्सनी “इतर वेळी ही आपल्याला ज्ञान वाटत असते परंतु आज स्वत: हेल्मेटशिवाय प्रवास करीत आहे.” अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या.

हेही वाचा : “आधी मित्रांना ब्रेकअपविषयी सल्ला द्यायचो, पण…” रणबीर कपूरने सांगितली ‘ती’ आठवण, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघांचे व्हायरल व्हिडीओ आणि फोटो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करीत मुंबई पोलिसांना टॅग केले होते. तसेच काहींनी दोघांवर कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली होती. मुंबई पोलिसांनी यावर “आम्ही याबाबत वाहतूक पोलिसांना माहिती दिली आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलीस काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अनुष्का शर्मा सध्या ‘कान्स’ फेस्टिव्हलची तयारी करीत आहे. याशिवाय लवकरच ती, ‘चकदा एक्स्प्रेस’ चित्रपटातून पुनरागमन करणार आहे.