Amitabh Bachchan praised son Abhishek Bachchan: अमिताभ बच्चन हे अनेकदा त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या पोस्टमुळेदेखील मोठ्या चर्चेत असतात. आता त्यांनी सोशल मीडियावर मुलगा अभिषेक बच्चनसाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टची मोठी चर्चा होताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन हे अनेकदा त्यांच्या ब्लॉगमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी या ब्लॉगमध्ये अभिषेकचे कौतुक केले आहे. अभिषेक बच्चनने आतापर्यंत त्याच्या कारकि‍र्दीत ज्या भूमिका केल्या, ज्या पद्धतीने त्या साकारल्या त्याचे कौतुक अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

अमिताभ बच्चन काय म्हणाले?

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या सुरुवातीला अभिषेकचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच सुरुवातीला अभिषेकचे प्रचंड कौतुक असल्याचे त्यांनी लिहिले. पुढे त्यांनी सुप्रसिद्ध लेखक व त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचा एक कोट लिहिला. माझी मुलं आहेत म्हणून ते माझे उत्तराधिकारी असणार नाहीत, तर जे माझे उत्तराधिकारी आहेत, ते माझी मुलं असतील, अशा आशयाचा तो कोट आहे.

बिग बींनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, “त्याने ज्या भूमिका स्वीकारल्या आणि साकारल्या, त्या पूर्ण समर्पणाने साकारल्या. त्याने जे चित्रपट आणि भूमिका निवडल्या, त्यामुळे त्याला नेहमीच वेगळे करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मिळाली आहे. “

मी लहान असताना महान हिंदी कवी श्री राम धारी सिंह अनेकदा प्रयागराजमध्ये आमच्या घरी यायचे. त्यावेळी एकदा ऑटोग्राफ देताना लिहिले होते की जे धाडस करतात आणि प्रयत्न करतात, त्यांना यश मिळते. मला त्या ओळी आठवल्या. अभिषेकने कायमच हे केले आहे. त्याला ज्या भूमिका आणि चित्रपट आव्हानात्मक वाटले, ते त्याने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याने प्रयत्न करण्याचे धाडस केले.” पुढे त्यांनी मला माझा वारसदार, माझ्या मुलाचे कौतुक आहे, असे लिहिले.

कामाच्या बाबतीत बोलायचे तर अभिषेक बच्चन नुकताच ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून कौतुक होताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता अभिनेता लवकरच ‘कालीधर लापता’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ४ जुलै २०२५ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’च्या पुढच्या सीझनचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.