बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांच्या अभिनयाचे, सौंदर्याचे लाखो-करोडो चाहते आहेत. अभिनेते राजेश खन्ना हे त्या कलाकारांपैकी एक आहेत. “१९७० च्या सुरुवातीला भारतात राजेश खन्ना(Rajesh Khanna) यांची प्रसिद्धी शीर्षस्थानी होती. सर्व वयोगटातील स्त्रिया त्यांच्या चाहत्या होत्या. काहींनी त्यांच्या कारला लिपस्टिक लावली तर काहींनी स्वत:च्या रक्ताने त्यांना पत्र लिहिली, अनेक महिलांनी त्यांच्या फोटोबरोबर लग्न केले.” या ओळी अविजित घोष यांच्या ‘व्हेन अर्ध सत्य मेट हिम्मतवाला’ या पुस्तकातील आहेत. चाहत्यांना राजेश खन्ना यांच्याविषयी अशाप्रकारे वेडे होते.

“टाइम हो गया है, पॅक अप”

राजेश खन्ना यांचे लाखो-करोडो चाहते आजही आहेत. १८ जुलै २०१२ ला राजेश खन्ना यांचे निधन झाले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १९ जुलै २०१२ ला अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग लिहिला होता, ज्यामध्ये त्यांनी राजेश खन्ना यांचे शेवटचे शब्द काय होते याचा खुलासा केला होता. अमिताभ बच्चन यांना राजेश खन्ना यांच्या जवळच्या व्यक्तीने याबद्दल सांगितले होते. गुदमरलेल्या आवाजात राजेश खन्ना यांनी “टाइम हो गया है, पॅक अप” असे त्यांनी म्हटले होते आणि ते त्यांचे शेवटचे शब्द होते.

पुढे त्यांनी राजेश खन्ना यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते म्हणतात की, पहिल्यांदा मी त्यांना फिल्मफेअर-माधुरी टॅलेंट कॉन्टेस्टचा विजेता म्हणून पाहिले होते. त्यानंतर मी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील रिवोली थिएटरमध्ये राजेश खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला ‘आराधना’ चित्रपट पाहिला होता. त्यावेळी त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची खचाखच गर्दी झाली होती आणि ज्याप्रकारे प्रेक्षक प्रतिक्रिया देत होते, त्याला तोड नव्हती. चित्रपटात काम करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी कोलकातामध्ये असलेली नोकरी सोडली होती. पुढे त्यांनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, राजेश खन्ना आणि त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांकडे पाहिल्यावर मला या नवीन क्षेत्रात कमी संधी आहे, असे वाटायचे.

हेही वाचा: अभिनेते व चित्रपट निर्माते कृष्ण कुमार यांच्या लेकीचे कर्करोगाने वयाच्या २१ व्या वर्षी निधन

१९७१ ला ‘आनंद’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांना कास्ट केले होते. या चित्रपटाची आठवण सांगताना अमिताभ बच्चन यांनी म्हटले होते की, तो माझ्यासाठी चमत्कार होता. देवाचा तो आशीर्वाद होता. जेव्हा कोणाला मी राजेश खन्ना यांच्याबरोबर काम करत आहे हे समजायचे, तेव्हा त्यांच्या नजरेत माझे महत्त्व वाढलेले मी पाहिले आहे.
राजेश खन्ना हे साधे आणि शांत माणूस होते. सेटवर भेट देणारे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होत असत. ते सतत माणसांनी वेढलेले असत. १९७० च्या काळात त्यांचे चाहते त्यांना स्पेनमधून भेटायला आले होते. त्यांच्या स्वभावात चुंबक होते, ज्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षिक व्हायचे; अशी आठवण अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून सांगितली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राजेश खन्ना या दिग्गज अभिनेत्याच्या निधनाला १२ वर्षे झाली आहेत. २०११ मध्ये त्यांना कर्करोगाचे निदान झाल्याचा खुलासा राजेश खन्ना यांची सहकलाकार मुमताज यांनी त्यांच्या मृत्यूनंतर केला होता.