Amitabh Bachchan shared a post after receiving the Filmfare Award: अभिषेक बच्चनला नुकताच ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला. ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता भावूक झाला होता. यावेळी जया बच्चन व त्याची बहीण श्वेता बच्चन हजर होती.

अभिषेकला पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने त्याच्या भावनादेखील व्यक्त केल्या. त्याने ऐश्वर्या व आराध्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. पुरस्कार मिळाल्यानंतर कलाकारांसह चाहत्यांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला. अभिषेकचे वडील म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी खास पोस्ट शेअर करीत त्याला शुभेच्छा दिल्या.

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी बच्चन कुटुंबातील तीन व्यक्तींना फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आले असून, त्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे वक्तव्य केले. अमिताभ बच्चन म्हणाले, “एक कुटुंब, एकाच कुटुंबातील तीन सदस्य. हे तीनही लोक एकाच क्षेत्रात काम करतात आणि तिघांना एकाच दिवशी पुरस्कार मिळाले.

जया व मला सिने आयकॉन हा पुरस्कार देण्यात आला. अभिषेकला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला. जया, अभिषेक व मी नशीबवान आहोत. प्रेक्षकांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद!

आता ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्स करीत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी अभिनंदन, असे लिहिले आहे. तर काहींनी लिहिले की, तुम्ही यासाठी पात्र आहात. एकाने लिहिले की, तुम्ही या देशाचा अभिमान आहे. एकाने लिहिले की, तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळाले. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

नेटकरी काय म्हणाले?

या सगळ्यात अनेक नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या रायचे नाव का घेतले नाही, असेही प्रश्न विचारले आहेत. “अभिनंदन! पण तुमच्या कुटुंबात ऐश्वर्या व आराध्या यांचा उल्लेख कधीच का नसतो?”, “ऐश्वर्या कुठे आहे?”, “ऐश्वर्याबद्दल काय? ती तुमच्या कुटुंबाचा भाग नाही का?”, “त्यांनी आधीच ऐश्वर्याला कुटुंबातून बाहेर काढलं आहे का?”, “अमिताभजी असे काय झाले की, तुम्ही तुमच्या प्रेमळ सूनेचे नाव घेतले नाही”, “ऐश्वर्या तुमच्या कुटुंबात आहे की नाही?”, “तुम्ही तुमच्या सुनेला विसरला का? तिला दोन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे”, “अभिनंदन! तुम्ही तुमच्या सुनेबद्दल काहीतरी बोलायला पाहिजे होते”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये ऐश्वर्याबद्दल विचारण्यात आले आहे.

ऐश्वर्याबद्दल बोलायचे, तर अभिनेत्रीला याआधी दोन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मात्र, या वर्षी तिला कोणताही पुरस्कार मिळाला नाही.

दरम्यान, सध्या अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहेत.