बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. बिग बींना शुक्रवारी सकाळी प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. अखेर स्वत: त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

बिग बींवर शुक्रवारी सकाळी कोकिलाबेन रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढउतार सुरू होते. नुकतीच त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यातून बरे होताच आज अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली अशा बातम्या सर्वत्र व्हायरल झाल्या होत्या. परंतु, या सगळ्यावर आता अमिताभ बच्चन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा : ‘सिद्धार्थ सीमा चांदेकर’, अभिनेत्याने सांगितलं आईचं नाव लावण्यामागचं कारण; म्हणाला…

अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी रात्री अभिषेकबरोबर एका सामन्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांना तब्येतीविषयी विचारण्यात आलं, यावर ती बातमी खोटी असल्याचं बिग बींनी पापाराझींना सांगितलं. सध्या हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी एक्स पोस्ट शेअर करत त्यांच्या सर्व चाहत्यांचे आभार मानले. त्यांनी या पोस्टमध्ये ‘सदैव कृतज्ञ’ असं म्हटलं होतं. या पोस्टमुळे बिग बींचे चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करू लागले व यामुळेच अँजिओप्लास्टी सर्जरी झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

हेही वाचा : “तुम्ही शूद्र मनाचे अतिशय शूद्र माणूस आहात,” म्हणणाऱ्या युजरला शरद पोंक्षेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “मराठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमिताभ बच्चन या आठवड्यात नाग अश्विनच्या कल्की 2898 AD च्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. येत्या मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सध्या या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट या प्रोजेक्टसाठी भरपूर मेहनत घेत आहे. यापूर्वी बिग बींना याच चित्रपटाच्या सेटवर दुखापत झाली होती. यामध्ये त्यांच्यासह प्रभास आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण महत्त्वाची भूमिकेत झळकणार आहेत.