Anant Ambani and Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा शुक्रवारी रात्री ( १२ जुलै ) थाटामाटात पार पडला. यावेळी आपल्या दोन्ही मुलांचा आनंद पाहून मुकेश व नीता अंबानी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. अनंत-राधिका एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन हे जोडपं आता लग्नबंधनात अडकलं आहे. या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी देश-विदेशातील पाहुणे मुंबईत आले होते. याशिवाय या सोहळ्याला बॉलीवूड कलाकारांची मांदियाळी जमल्याचं पाहायला मिळालं.

आलिया भट्ट, रणबीर कपूर, रणवीर सिंह, दीपिका, विकी कौशल, कतरिना, माधुरी, अनिल कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, जान्हवी-खुशी, सारा अली खान, सलमान खान, शाहरुख व गौरी, करण जोहर असे सगळे बॉलीवूड सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. एवढेच नव्हे तर ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा खास या लग्नासाठी परदेशातून भारतात आली होती. त्यामुळे अंबानींच्या घरचा लग्नासोहळा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. या सगळ्यात काही सेलिब्रिटींनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं हे कलाकार नेमके कोण आहेत जाणून घेऊयात…

हेही वाचा : “शक्तिमान, अलीबाबा त्याचे ४० चोर…”, अंबानींच्या लग्नात जॉन सीनाला पाहून मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला…

बॉलीवूड कलाकारांसह क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंनी देखील या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. हार्दिक पंड्या, धोनी, बुमराह, सूर्यकुमार, युझवेंद्र चहल हे खेळाडू लग्नमंडपात आपल्या कुटुंबीयांसह पोहोचले होते. परंतु, या सोहळ्याला विराट कोहली उपस्थित राहिला नव्हता. अनुष्का व विराट सध्या लंडनमध्ये असल्याने ते दोघंही या सोहळ्याला उपस्थित नव्हते.

हेही वाचा : Video: अजय-अतुल, श्रेया घोषलचा लाईव्ह परफॉर्मन्स अन् राधिका मर्चंटची सुंदर रथातून मंडपात ग्रँड एन्ट्री; तर अनंत अंबानी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंबानींच्या लग्नसोहळ्याला ‘हे’ बॉलीवूड कलाकार गैरहजर

  • श्रद्धा कपूर
  • सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल
  • सैफ अली खान व करीना कपूर
  • करिश्मा कपूर
  • काजोल
  • अक्षय कुमार
  • कंगना रणौत
  • विराट कोहली व अनुष्का
  • सनी देओल व बॉबी देओल
  • तब्बू
  • परिणीती चोप्रा
  • आमिर खान
  • शिल्पा शेट्टी
  • कार्तिक आर्यन
  • भूमी पेडणेकर

दरम्यान, हे बॉलीवूड सेलिब्रिटी लग्नाला का उपस्थित राहिले नाहीत याचं कारण समोर आलेलं नाही. याशिवाय अनंत- राधिकाच्या लग्नाला अनेक परदेशी पाहुणे देखील उपस्थित राहिले होते. आता रविवारी १४ जुलै रोजी अंबानींनी मुलाच्या लग्नानंतर रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे. याला देखील अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.