‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या अभिनयाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी या चित्रपटाबद्दल आपला अभिप्राय दिला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी हा चित्रपट अत्यंत कठीण टप्प्यावर असताना अंकितानं त्यांना कशी मदत केली त्याबद्दल सांगितलं.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत संदीप म्हणाले, “जेव्हा मी मिस्टर भन्साळींबरोबर सीईओ म्हणून काम करीत होतो तेव्हा मी ‘राम-लीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मेरी कोम’, ‘गब्बर इज बॅक’ व ‘राउडी राठोड’ या चित्रपटांची सह-निर्मिती करीत होतो, तेव्हापासून अंकिता हीच एक माझी मैत्रीण होती; जिचा माझ्यावर विश्वास होता. खरं तर, अंकिता आणि कंगना याच पहिल्या लोकांपैकी एक होत्या; ज्यांनी मला सांगितलं की, तू दिग्दर्शक व्हायला पाहिजेस.”

हेही वाचा… हॉलीवूड अभिनेता विन डिझेलने शेअर केला दीपिका पदुकोणसह फोटो, म्हणाला…

“ती मला (अंकिता) म्हणाली होती की, संदीप जेव्हाही तुम्ही चित्रपट बनवाल तेव्हा त्यात मी अभिनय करीन “जेव्हा मी ‘सफेद’ चित्रपट बनवला तेव्हा मी तिच्याशी संपर्क साधला; पण ती चित्रपट करू शकली नाही. पण जेव्हा मी शूटिंग करीत होतो तेव्हा आम्ही दोघं संपर्कात होतो.” असं संदीप पुढे म्हणाले.

हेही वाचा… आलिशान घर, लक्झरी गाड्यांचं कलेक्शन अन्…; तापसी पन्नू आहे कोट्यवधींची मालकीण

अंकितानं कोणत्या परिस्थितीत हा चित्रपट साईन केला याबद्दल त्यानं अधिक तपशीलवार माहिती दिली. त्यांच्या संवादाबाबत बोलताना ते म्हणाले, “ज्या वेळी मी ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट करायला घेतला त्यावेळी कोणीही माझ्याबरोबर काम करायला इच्छुक नव्हते. कारण- तेव्हा मी खूप मीडिया ट्रायलमधून गेलो होतो. मी तिला कधीच सांगितलं नव्हतं की, माझ्याबरोबर कोणीच काम करू इच्छित नाही. अंकितानं ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटात यमुनाबाईंची भूमिका साकारावी, असं मला वाटत होतं.“ त्यावर ती म्हणाली, “माझी एक अट आहे की, मी या चित्रपटासाठी पैसे घेणार नाही. मी तुमच्याकडून कोणत्याही भूमिकेसाठी कधीही पैसे घेऊ शकत नाही.“ तेव्हा मी म्हणालो, “म्हणजे तू माझ्या सगळ्या चित्रपटांत काम करणार आहेस.”

हेही वाचा… तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडकेच्या लग्नाला एक महिना पूर्ण; बहीण खुशबू फोटो शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं दिग्दर्शन, सहलेखन व सहनिर्मिती रणदीप हुडा यानं केली आहे. या चित्रपटात अमित सियाल, राजेश खेरा, लोकेश मित्तल, ब्रजेश झा, संतोष ओझा, राहुल कुलकर्णी, मृणाल दत्त, संजय शर्मा, सल यूसुफ आणि इतरही महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. २२ मार्च रोजी हिंदी आणि मराठी या भाषांत हा चित्रपट प्रदर्शित झाला.