scorecardresearch

Premium

‘अ‍ॅनिमल’स्टार रणबीरबरोबर पुन्हा कधीच काम करू इच्छित नाही अनुराग कश्यप; दिग्दर्शकाने सांगितलं कारण

अनुरागने पिंकव्हीलाशी संवाद साधताना रणबीर आणि आलिया दोघांचं कौतुक केलंच, पण पुन्हा रणबीरबरोबर काम करण्यास मात्र त्याने साफ नकार दिला

anurag-kashyap-ranbir-kapoor
फोटो : इंडियन एक्सप्रेस

रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांत जगभरात ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात रणबीर आणि बॉबी देओल या दोघांच्या कामाचं कौतुक होत आहे. चित्रपटावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड टीका होताना दिसत आहे. स्त्रियांच्या बाबतीत हिंसाचार अन् त्यांना मिळणारी वर्तणूक यामुळे बरीच लोक या चित्रपटावर ताशेरे ओढत आहेत.

चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटीजदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत तर काहींनी या चित्रपटाचं कौतुकही केलं आहे. यामध्ये राम गोपाल वर्मा, अर्शद वारसी, अनुराग कश्यपसारखी काही मंडळी सामील आहेत. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान अनुरागने रणबीर आणि त्याची पत्नी आलिया या दोघांबद्दल वक्तव्य केलं आहे.

Nitish Kumar New cm of bihar
नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी जिथं होतो…”
Ankita lokhande mother reacted on Vicky jain party with girls
लेक घरी नसताना जावयाने गर्ल गँगसह केली पार्टी; अंकिता लोखंडेच्या आई म्हणाल्या, “विकीने त्या सर्वांना…”
What Tasleema Nasreen Said?
“मला वाटतं शोएब मलिक एक दिवस सना जावेदलाही घटस्फोट देईल आणि…”, तस्लिमा नसरीन यांची परखड शब्दांत टीका
study or protest Examination malpractice Unemployed youth Competitive Exam Prerequisites
अभ्यास करायचा की आंदोलनेच?

आणखी वाचा : ‘फेमीनिजम’बद्दलच्या वादग्रस्त विधानावर नीना गुप्ता यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “मला दोष देण्यापेक्षा…”

अनुरागने पिंकव्हीलाशी संवाद साधताना रणबीर आणि आलिया दोघांचं कौतुक केलंच, पण पुन्हा रणबीरबरोबर काम करण्यास मात्र त्याने साफ नकार दिला. याआधी अनुरागने रणबीरसह ‘बॉम्बे वेल्वेट’ हा चित्रपट केला जो बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. त्यानंतर या जोडीने पुन्हा एकत्र काम केलेलं नाही. त्याबद्दल अनुराग म्हणाला, “रणबीर आणि आलिया हे सध्या भारतातील सर्वोत्तम कलाकार आहेत, शिवाय ते दोघेही आता लग्नबंधनात अडकले आहेत. ‘अ‍ॅनिमल’ यशस्वी ठरलाय हे त्याच्यासाठी खरंच चांगलं आहे.”

पुढे रणबीरसह काम करण्याबद्दल अनुराग म्हणाला, “रणबीरबरोबर काम करायला कोणाला नाही आवडणार? हे समजून घ्यायला मला फार वेळ लागला, पण माझ्याकडे ब्लॉकबस्टर चित्रपट बनवण्याचा फॉर्म्युला नाही आणि जेव्हा स्टार्स काही वेगळे प्रयोग करतात तेव्हा त्यांना आणि पर्यायाने मलाही बोलणी ऐकावी लागतात. जेव्हा एखादा अभिनेता स्टार बनतो तेव्हा त्याचे असंख्य फॅन्स तयार होतात अन् मग नंतर आपआपल्या लाडक्या स्टार्सच्या फॅनक्लबमध्येच कशाप्रकारे वाद विवाद होतात हे आपण पाहिलं आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या स्टारबरोबर काम करता तेव्हा त्यांच्या फॅन्सनादेखील तुम्हाला खुश ठेवावं लागतं. काही दिग्दर्शकांना ते बरोबर जमतं, पण मला मात्र ते अजिबात जमत नाही.” असं कारण देत अनुरागने पुन्हा रणबीरबरोबर काम न करण्याबद्दल भाष्य केलं.

‘अ‍ॅनिमल’बद्दल आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाबद्दल अनुराग म्हणाला, ““मी अद्याप ‘अ‍ॅनिमल’ पाहिलेला नाही, पण चित्रपटाविषयी इंटरनेटवर होणारी चर्चा मला ठाऊक आहे. एखाद्या फिल्ममेकरने कसा चित्रपट काढावा आणि कसा काढू नये हे सांगायचा अधिकार कोणालाही नाही. एका चित्रपटामुळे या देशातील बरेच लोक दुखावले जातात. माझ्या चित्रपटाच्या बाबतीतही लोक असेच व्यक्त होतं, किमान शिकलेल्या लोकांकडून तरी मला असे वर्तन अपेक्षित नाही.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anurag kashyap will never work with animal star ranbir kapoor avn

First published on: 08-12-2023 at 17:36 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×