scorecardresearch

शाहरुख खानच्या होस्टिंगबद्दल अरबाज खानचं मोठं वक्तव्य; भाऊ सलमान आणि बिग बींबरोबर केली तुलना

शाहरुखचं सूत्रसंचालन नैसर्गिक आणि उत्तम नसल्याचा खुलासा अरबाज खानने केला आहे

arbaaz khan shahrukh khan
फोटो : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याने अभिनयात नशीब आजमावलं पण तिथे त्याचा फारसा जम बसू शकला नाही. काही मोजक्या चित्रपटात अरबाजने अभिनय केला पण आपला भाऊ सलमान खानसारखं प्रेक्षकांवर पकड घेण्यात तो अपयशी ठरला. नंतर अरबाजने त्याचं पूर्ण लक्ष निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे दिलं. नुकतंच ‘बॉलिवूड बबल’ या युट्यूब चॅनलवर अरबाज खानने एक टॉक शो सुरू केला आहे.

यानिमित्तानेच अरबाज खानने नुकतंच एक वक्तव्य केलं आहे ज्यात त्याने शाहरुख खानच्या होस्टिंगवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. शाहरुख खाननेही काही टेलिव्हिजन शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम केलं आहे, शाहरुखचं सूत्रसंचालन तेवढं नैसर्गिक आणि उत्तम नसल्याचा खुलासा अरबाज खानने केला आहे.

आणखी वाचा : आईच्या साधेपणाबद्दल भाष्य करणारी कंगना रणौतची खास पोस्ट; फिल्म माफियालाही सुनावले खडेबोल

‘फ्रीप्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरबाजने याबद्दल भाष्य केलं आहे. शिवाय तो स्वतः ज्या पद्धतीने होस्टिंग करतो ते खूप सहज आणि नैसर्गिक असल्याचं त्याचं म्हणणं आहे. यामध्ये त्याने त्याचा भाऊ सलमान खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांचं उदाहरण दिलं आहे. तो म्हणाला, “दस का दम या कार्यक्रमातून सलमान खानने कमबॅक केलं, खुद्द बच्चन साहेब आजही कौन बनेगा करोडपतीचं सूत्रसंचालन करत आहेत. या दोघांचे फिल्मी करिअरदेखील अगदी उत्तम सुरू आहे. हीच गोष्ट शाहरुख खानला जमली नाही.”

पुढे अरबाज म्हणाला, “मला वाटतं शाहरुख खान छोट्या पडद्यावर निरागसता आणि नैसर्गिकता आणण्यात अपयशी ठरला. लोकांना तो खोटा किंवा बेगडी वाटला. टेलिव्हिजनवर काम करताना तुम्ही मुखवटे धारण करून राहू शकत नाही, त्यासाठी अमिताभ बच्चन यांच्यासारखं तुम्ही चलाख असायला हवं. बच्चनजी हे त्यांच्या प्रेक्षकांना ओळखून होते, शाहरुखला ही गोष्ट नेमकी जमली नाही.” अमिताभ बच्चन यांच्या अनुपस्थितीत शाहरुख खानने काही काळ ‘कौन बनेगा करोडपती’चं सूत्रसंचालन केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 16:22 IST
ताज्या बातम्या