हिंदी सिनेसृष्टीतून आज दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचे शुक्रवारी सकाळी (२४ नोव्हेंबर रोजी) हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. ‘बिग बॉस ७’ फेम अभिनेता अरमान कोहलीचे ते वडील होते.

अरमान कोहलीचा मित्र विजय ग्रोव्हरने राजकुमार कोहली यांचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. “राज जी यांचे आज सकाळी निधन झाले. ते सकाळी ८ वाजता आंघोळीसाठी गेले होते, पण बराच वेळ बाहेर आले नाहीत. त्यामुळे अरमानने बाथरूमचा दरवाजा तोडून पाहिलं असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,” अशी माहिती विजयने ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिली.

“माझ्या दोन्ही पत्नी…”, जेव्हा सलीम खान यांनी आपल्या लग्नांबद्दल केलेलं भाष्य; म्हणाले, “मी ते जाणीवपूर्वक…”

राजकुमार कोहलीने रीना रॉय, सुनील दत्त, फिरोज खान, संजय खान, रेखा आणि मुमताज अभिनीत ‘नागिन’सारख्या (१९७६) अनेक बिग बजेट व तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यानंतर त्यांनी रीना रॉय, नीतू सिंग, सुनील दत्त, संजीव कुमार, जितेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत ‘जानी दुश्मन’चे दिग्दर्शन केले. मिथुन चक्रवर्ती, डिंपल कपाडिया, मीनाक्षी शेषाद्री आणि विनोद मेहरा अभिनीत ‘बीस साल बाद’ (१९८८) हा त्यांच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीत पंधराहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

“मी मागच्या २५ ते २६ वर्षांपासून रात्री…”, सलमान खानचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजकुमार कोहली यांनी हिंदीसह पंजाबी चित्रपटांची निर्मितीही केली होती. ‘गोरा और काला’ (१९७२), ‘डंका’ (१९६९), ‘दुल्ला भाटी’ (१९६६), ‘लुटेरा’ (१९६५), ‘मैं जट्टी पंजाब दी’ (१९६४), ‘पिंड दी कुर्ही’ (१९६३) आणि ‘सपना’ (१९६३) या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती.