scorecardresearch

Premium

रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ पाहून अर्शद वारसीने मानले नीतू आणि ऋषी कपूर यांचे आभार; म्हणाला, “हा मास्टरपीस…”

अर्शदने चित्रपटाचं प्रचंड कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे तर त्याने रणबीरच्या कामाचीही खूप प्रशंसा केली आहे

arshad-warsi-animal-post
फोटो : इंडियन एक्सप्रेस

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाने सर्व भाषांमध्ये ७२.५० कोटींची कमाई केली.

आणखी वाचा : रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर धुडगूस; लवकरच पार करणार ५०० कोटींचा टप्पा; पाचव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

Gautami Patil First Time Revels Real Name Chatting With Fan Gautami Patil Lavani Video To Surname and Leaked Video Controversy
गौतमी पाटीलचं खरं नाव माहितेय का? चाहतीशी गप्पा मारताना स्वतःचं केला खुलासा.. आडनावावरूनही झाला होता वाद!
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
Mahesh Manjrekar
कधी तरी मरू या भीतीमुळे आजचं जगणं कधीच थांबवू नये – महेश मांजरेकर
karan grover
‘चांगल्या कामाच्या बळावरच चित्रपटसृष्टीत टिकू शकता’

चित्रपटाची अशीच यशस्वी घोडदौड बॉक्स ऑफिसवर सुरू असून चार दिवसात या चित्रपटाने जगभरात ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट ‘मंडे टेस्ट’मध्ये पास झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सोमवारी ५० कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने पाचव्या दिवशी ३८ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटावर बरीच टीका होत आहे, चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटीजनीदेखील यावर टीका केली असून काहींनी याचं कौतुक केलं आहे. यातच आता अर्शद वारसीचं नाव जोडलं गेलं आहे.

अर्शदने चित्रपटाचं प्रचंड कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे तर त्याने रणबीरच्या कामाचीही खूप प्रशंसा केली आहे. ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर ट्वीटकरत अर्शद म्हणाला, “मी कालच ‘अ‍ॅनिमल’ पाहिला, आणि हा अत्यंत उत्कृष्ट चित्रपट आहे, मला वाटतं की नितूजी आणि ऋषीजी यांचं भेटणं विधीलिखित होतं कारण जगाला रणबीर कपूरची आवश्यकता होती. या माणसाच्या अभिनय कौशल्याला कोणत्याही सीमा नाहीत. हा मास्टरपीस बनवल्याबद्दल निल कपूर, संदीप रेड्डी वांगा, रश्मिका मंदान्ना आणि संपूर्ण ‘अ‍ॅनिमल’ टीमचे मनःपूर्वक आभार.”

याआधी दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही त्यांच्या खास शैलीत ‘अ‍ॅनिमल’चा रिव्यू शेअर करत कलाकार आणि दिग्दर्शकांचे आभार मानले होते. एकूणच या चित्रपटाबद्दल सेलिब्रिटीजमध्येसुद्धा दोन वेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहे. लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arshad warsi praises ranbir kapoors animal calls it a masterpiece avn

First published on: 06-12-2023 at 17:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×