बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका असीस कौरने आयुष्याची नवी इनिंग सुरु करीत तिचा प्रियकर आणि संगीतकार गोल्डी सोहेलबरोबर लग्नगाठ बांधली आहे. असीस आणि गोल्डीने शनिवारी (१७जून) गुरुद्वारामध्ये लग्न केले यावेळी त्यांच्या कुटुंबातील काही जवळचे लोक उपस्थित होते.

हेही वाचा : “वाल्मिकी रामायणाचा घोर अपमान” ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर संतापले; म्हणाले “हा तमाशा…”

असीस कौरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करीत, असीसने ‘वाहेगुरु तेरा शुक्र है’ असे कॅप्शन दिले आहे. सोनाक्षी सिन्हा, हिना खान, युविका चौधरी, गौहर खान, ध्वनी भानुशाली, जस्सी गिल, पायल देव आणि कनिका कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “प्रेम, मैत्री आणि दु:ख…” बहुचर्चित ‘द आर्चीज’चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, ३ स्टारकिड्सचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

असीस कौर आणि गोल्डी सोहेल दोघेही एकमेकांना अनेक वर्षापासून ओळखत आहेत. दोघांच्या लग्नाचा कार्यक्रम अतिशय खाजगी ठेवण्यात आला होता. असीस-सोहेलच्या लग्नाचे विधी गुरुद्वारामध्ये संपन्न झाले. या वेळी फक्त कौटुंबिक सदस्य आणि त्यांचा जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. हे नवीन जोडपं लग्नानंतर आशीर्वाद घेण्यासाठी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेरशाह चित्रपटातील ‘रातां लम्बियां’ , कपूर अँड सन्समधील ‘बोलना माही बोलना’, सिंबा चित्रपटातील ‘तेरे बिन’, ‘बंदेया रे बंदेया’ अशी लोकप्रिय गाणी असीस कौरने गायली आहे. तिचे ‘रातां लम्बियां’ गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.