सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के.एल राहुल आज विवाह बंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्याच्या बंगल्यावर हा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. त्यांच्या बंगल्याचे, त्यांच्या लग्नाच्या संगीत कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आतापर्यंत या फोटोमध्ये अथिया किंवा राहुल यांची झलक दिसलेली नाही. त्यामुळे लग्नातला या दोघांचा लूक कसा असेल हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
सेलिब्रिटींच्या लग्नाप्रमाणेच त्यांच्या लग्नातला लूकची ही सर्वत्र चर्चा होत असते. अनुष्का-विराटपासून ते यावर्षी विवाह बंधनात अडकलेल्या रणबीर-आलिया यांच्या लूकची प्रचंड चर्चा झाली. सब्यसाची या नामांकित ब्रँडने त्यांच्या विवाह सोहळ्याचा पोशाख तयार केला होता. त्याच ब्रँडचे कपडे अथिया आणि राहुलही त्यांच्या लग्नात परिधान करणार आहेत.
आणखी वाचा : विकी-कतरीनाच्या पावलावर पाऊल ठेवत अथिया शेट्टी-के.एल राहुलने लग्नाबाबत घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय
रिपोर्टनुसार, आपल्या लग्नासाठी अथिया आणि राहुल यांनी लाल नाही, तर पांढऱ्या आणि सोनेरी रंगाचे कपडे निवडले आहेत. अथियाचा या रंगाचा घागरा परिधान करेल तर राहुल या रंगाची शेरवानी त्यांच्या लग्नात परिधान करणार आहे. त्याचप्रमाणे या आपापल्या कपड्यांसाठी त्यांनी एक खास डिझाईनही निवडलं असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या कपड्यांची किंमत लाखांच्या घरात आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नातील त्यांचा लूक कधी समोर येणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल राहुल गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत होते. अनेकदा ते एकत्र फिरतानाही दिसले. आता आज त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होणार आहे. या लग्न सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांबरोबरच क्रिकेटर्सही उपस्थित राहणार आहेत.