भोजपुरी अभिनेता ते भाजपा खासदार असा प्रवास करणारे रवी किशन हे नाव कोणत्याही व्यक्तीला नवीन राहिलेलं नाही. भोजपुरी चित्रपटांमधून करिअरची सुरुवात करणारे रवी किशन हे आज लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहेत. कधी राजकारणामुळे तर कधी चित्रपटामुळे ते चर्चेत येत असतात. त्यांनी आपल्या करियरमध्ये मोठा संघर्ष केला आहे. मात्र करियरच्या सुरवातीच्या टप्प्यात त्यांनादेखील कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता.

कास्टिंग काऊच या प्रकाराला अनेक अभिनेते,या अभिनेत्री सामोरे गेले आहेत. चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने अभिनेते, अभिनेत्रींनाचा निर्माते, दिग्दर्शक फायदा घेत असतात. रवी किशन नुकतेच आप की अदालत या कार्यक्रमात आले होते तिथे त्यांनी खासगी आयुष्याबद्दल, राजकारणाबद्दल भाष्य केलं आहे तसेच कास्टिंग काऊचबद्दल वक्तव्य केलं आहे. ते असं म्हणाले, “एका अभिनेत्रीने त्यांना रात्री कॉफी पिण्यासाठी बोलवले होते. ते असं म्हणाले “मला याची कल्पना आली होती. मी त्या व्यक्तीचे नाव घेणार नाही कारण ती आता प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखली जाते.”

शाहरुखच्या ब्लॉकबस्टर ‘पठाण’ चित्रपटाची पाकिस्तानी अभिनेत्याने उडवली खिल्ली; ‘या’ गोष्टीशी केली तुलना

ते पुढे म्हणाला “मला नेहमी माझ्या वडिलांचे शब्द आठवतात ते नेहमी सांगायचे प्रामाणिकपणे काम कर. शॉर्टकट घेण्याच्या फंदात कधीच पडू नकोस.” असा खुलासा त्यांनी मुलाखतीदरम्यान केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवी किशन मूळचे उत्तर प्रदेशचे मात्र त्यांचा जन्म मुंबईत झाला आहे. नव्वदच्या दशकात त्यांनी आपल्या करियरला सुरवात केली. ‘पितांबर’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हिंदीबरोबरच त्यांनी अनेक सुपरहिट अशा भोजपुरी चित्रपटात काम केलं आहे. चित्रपटच नव्हे तर त्यांनी राजकारणात आजमावले. २०१७ साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते.