बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरुन वादंग सुरू आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान करत रोमान्स केल्यामुळे हा वाद सुरू झाला. ‘बेशरम रंग’ गाण्यावरील वाद ताजा असतानाच आता आणखी एका अभिनेत्रीने भगव्या रंगाची बिकीनी घातलेला व्हिडीओ शेअर केला आहे.

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नम्रता भगव्या रंगाची बिकिनी घालून समुद्रात हॉट डान्स करताना दिसत आहे. ज्या गाण्यावरुन वाद सुरू आहे त्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावर तिने डान्स केला आहे. नम्रताचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>>“स्वघोषित मावळे माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा लावून…” केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

हेही वाचा>>शाहरुख खानच्या मुलांनाही पाहायचा नाही ‘पठाण’, ‘या’ चित्रपटासाठी उत्सुक; अभिनेत्यानेच केला खुलासा

नम्रताच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे तिला ट्रोलही केलं आहे. एकाने कमेंट करत “बॉयकॉट गॅंग कुठे आहे”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “भगव्या रंगाची बिकिनी भारतात बॅन आहे. तुला समजत नाही का?”, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा>>“…म्हणून यांना मनापासून ‘साहेब’ म्हणावंसं वाटतं”, मराठी अभिनेत्याने राज ठाकरेंसाठी केलेली पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नम्रता मल्ला भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा नम्रता तिचे व्हिडीओ व फोटो शेअर करत असते.