टी-सीरिजचे मालक भूषण कुमार आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. बॉलिवूडचं हे लाडकं जोडपं बऱ्याचदा आपल्याला एकत्र दिसलं आहे. सण असो किंवा प्रोडक्शन कंपनीचा इव्हेंट हे दोघे नेहमीच एकत्र दिसायचे. या दोघांना एक मुलगाही आहे. १९ वर्षांच्या सुखी संसारानंतर हे जोडपं घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगताना दिसत आहेत. त्यामागे कारणंही तशीच आहेत. नेमकं यात तथ्य किती तेच आपण जाणून घेणार आहोत.
२१ फेब्रुवारीला संध्याकाळी उशिरा दिव्याने तिच्या इंस्टाग्राम हॅंडलवरुन भूषण कुमार यांचं आडनाव तर हटवलं पण याबरोबरच तिने ‘टि सीरिज’लाही अनफॉलो केल्याचं स्पष्ट केलं. यानंतरच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांत हे जोडपं कोणत्याही इव्हेंटमध्ये एकत्र न दिसल्याने या चर्चेला आणखी जोर मिळाला आहे.
आणखी वाचा : “ते धूम्रपान किंवा मद्यपान…” सोनम कपूरने सांगितलं अनिल कपूर यांच्या फिटनेसमागील नेमकं रहस्य
परंतु ‘झुम’च्या रीपोर्टनुसार दिव्या खोसला ही भूषण यांच्या खासगी इंस्टाग्राम अकाऊंटला फॉलो करत आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या या बातम्या खोट्या असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. याबरोबरच भूषण कुमार यांच्या टीमने ‘झुम’ला दिलेल्या माहितीनुसार या बातम्या साफ खोट्या असून त्यात काही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. ‘झुम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भूषण कुमार यांच्या निकटवर्तीयाने सांगितलं, “भूषण कुमार यांचं आडनाव काढण्याचा दिव्या खोसलाचा निर्णय हा सर्वस्वी वैयक्तिक आहे अन् ज्योतिषाच्या सांगण्यावरुनच तिने असं केलं आहे, शिवाय तिने तिच्या नावामध्ये एक आणखी ‘s’देखील लावला आहे.”
काही वैयक्तिक कारणांमुळे दिव्या खोसलाने असं केल्याचं यावरुण स्पष्ट झालं आहे. हे ऐकून दिव्या खोसलाच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. दिव्या कुमार ही गेल्या काही वर्षांपासून बॉलिवू़डमध्ये सक्रिय आहे. तिनं अनेक चित्रपटांमध्ये अभिनयही केला आहे. २००४ मध्ये तिनं ‘लव टुडे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अनेक गाण्यांचं दिग्दर्शन केल्यानंतर तिनं २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या यारीया या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं. तसेच चित्रपटातील ५ गाणी कोरिओग्राफही केली.