सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर अनेक जण त्याची भेट घेत आहेत. राज ठाकरे, बाबा सिद्दीकी, झिशान सिद्दीकी यांनी त्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. तर, त्याचे भाऊ सोहेल, अरबाज, पुतण्या अरहान व त्याची बहिणी अर्पिता व तिचा पती आयुष शर्मा यांनी त्याची गॅलेक्सी अपार्टमेंटला भेट दिली. या घटनेबद्दल अनेक सेलिब्रिटी प्रतिक्रिया देत आहेत. अशातच मराठमोळ्या शिव ठाकरेने या घटनेबद्दल विधान केलं आहे.

शिव ठाकरे ‘बिग बॉस १६’ मध्ये सहभागी झाला होता, या शोचा होस्ट सलमान खान आहे. आता सलमानच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवने प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात पापाराझींशी संवाद साधताना शिव म्हणाला, “सलमान खान सुरक्षित आहेत. देवाचे आशीर्वाद सलमानबरोबर आहेत. त्यांना काहीही होणार नाही, (ऊपरवाले की दुआ है उनके साथ) देव त्यांच्याबरोबर आहे. आमच्यासारखे खूप लोक त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांना काहीच होणार नाही.”

घरावर गोळीबार झाल्यावर सलमान खानचा मोठा निर्णय, अभिनेत्याने सांगितलं की कोणीही आता…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलमान खानच्या घरावर रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दोन हल्लेखोरांनी पहाटे ५ वाजता त्याच्या घरावर चार ते पाच गोळ्या झाडल्या. ही घटना घडली तेव्हा सलमान खान व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य घरात होते. पण कोणीही या घटनेत जखमी झालेलं नाही. या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने घेतली आहे.