बॉलिवूडच्या कलाकारांपेक्षा त्यांची मुलं जास्त चर्चेत आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानदेखील चर्चेत असतो. आणखीन एक स्टार किड चर्चेत असते ती म्हणजे अनन्या पांडे. अनन्या तिच्या चित्रपटांपेक्षा इतर कारणांमुळे ट्रोल होत असते. तिचे वडील चंकी पांडे नव्वदच्या दशकात एक प्रसिद्ध अभिनेते होते. आपल्या मुलीबद्दल ते कायमच भरभरून बोलत असतात. नुकतीच त्यांनी एका इंडिया टुडेशो बोलताना अनन्याबद्दल भाष्य केलं आहे.

अनन्या नुकतीच ‘लाइगर’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटासाठी तिने भरपूर मेहनत घेतली होती. मात्र तरीदेखील चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. याबद्दल चंकी पांडे असं म्हणाले, “हे प्रत्येक चित्रपटाच्याबाबतीत घडू शकतं. एखादा अभिनेता चित्रपटासाठी १००% देत असतो. त्यासाठी प्रमोशन करतो मात्र कुठेतरी गोष्टी चुकतात आणि मग पदरी निराशा येते. पण तुम्हाला ते पटवून घ्यावं लागत आणि पुढे निघून जावं लागत. हा एक अवघड व्यवसाय आहे आणि मला वाटते की अनन्याला याची जाणीव आहे. त्यांनी पुढे नमूद केले की अनन्याला या व्यवसायातील धोक्यांची जाण आहे. ते पुढे म्हणाले कधी कधी आपल्याला १०० टक्के खात्री असते मात्र प्रत्यक्षात त्याचा प्रतिसाद ०% असतो मात्र कधी कधी एखाद्या गोष्टीबद्दल ०% खात्री असते मात्र त्याचा प्रतिसाद १००% मिळतो. हा सगळं शोबिजचा प्रकार आहे. त्यामुळे यात कशाला कमी लेखू नका किंवा जास्त लेखू नका.” अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

सावरकरांवरील बायोपिकसाठी रणदीप हुड्डाने केला ‘हा’ बदल; म्हणाला, “या भूमिकेसाठी…”

लाइगरच्या अपयशाबद्दल बोलताना ते म्हणाले, “हा चित्रपट बहुभाषिक होता, ज्याचे प्रमोशनही खूप चांगले झाले होते आणि त्यात उत्तम संगीत होते. मात्र या चित्रपटावर ४०० लोक काम करत होते. तुम्हाला फक्त अभिनेते दिसतात मात्र पडद्याआड तुम्हाला माहिती नसते. म्हणून एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे अंतिम परिणाम काय होईल हे आपल्याला कधीच माहित नाही. त्यामुळे जे परिणाम असतील त्याला सामोरे जा आणि पुढे निघून जा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लाइगर’ च्या अपयशानंतर अनन्याने आयुष्मान खुरानाबरोबरच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं. तसेच झोया अख्तर आणि रीमा कागती लिखित ‘खो गये हम कहाँ’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याचं अनन्याने पोस्ट करत सांगितलं आहे. सध्या ती अभिनेता आदित्य रॉय कपूरला डेट करत आहे अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.